Sewage and water pipelines in Tehran exploded amid israel strike
Israel Iran War news Marathi : तेहरान : सध्या इराण मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे इस्रायलचे हल्ले तर दुसरीकडे राजधानी तेहरानमध्ये पूर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलने हल्ला केला होता. या हल्ल्यात जमिनीखालील सीवर आणि पाणी पुरवठ्याची पाइपलाईन फुटली. यामुळे तेहरानच्या रस्त्यांवर घाणेरड्या पाण्याचा पूर आला आहे. यामुले लोकांचे जीवन अत्यंत कठी झाले आहे.
तेहरानमध्ये लोक रस्ता पार करण्यासाठी लाकडे, विट, पत्रा, तात्परुते पूलाचा वापर करत आहे. अनेकांच्या घरांमध्ये -दुकानांमध्ये घाणरेडे पाणी शिरले आहे. यामुळे व्यापर ठप्प झाला आहे. यामुळे लोकांना आपली घरे सोडून जावे लागले आहे. इराणच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, युद्धामुळे देशातील पायाभूत सुविधांवरही गंभीर परिणाम झाला आहे. पाइपलाइलच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.
दरम्यान इस्रायलच्या हल्ल्यामुळे संरक्षण अलर्ट आणि सायरनचा आवाज येत आहे, यामुळे लोक हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी पळत आहे. अशा परिस्थिती काम करणे अत्यंत कठीण झाले आहे. बॉम्बसोबतच, आता दुर्गंधीमुळे आजाराची भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे.
Sewage and water pipelines in #Tehran exploded following a strike.
So fragile – one hit and the capital starts leaking from every pipe. pic.twitter.com/7UUwqV56Zi
— נועה מגיד | Noa magid (@NoaMagid) June 15, 2025
परिस्थिती नियं६णात आणण्यात अडथळ निर्माण होत आहे. जर वेळेत परिस्थिती नियं६णात आली नाही तर डेंग्यू, कॉलरा, यांसारखे आजार पसरण्याची शक्यता आहे.
एककीडे युद्धाची परिस्थिती आहे, तर दुसरीकडे घाणरेड्या पाण्यामुळे लोकांना हाल झाले आहेत. अशा परिस्तितीत लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. इकडे आड आणि तिकडे विहिर अशी परिस्थीती सध्या इराणमध्ये पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी १३ जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. इराणच्या अणु तळांना, लष्करी कमांड सेटंर्सना आणि अधिकाऱ्यांना हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने देखील इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. शनिवारी र१४ जूनच्या रात्री दोन्ही देशांनी एकमेकांवर तीव्र हल्ले केले. यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहे.