PM मोदी तीन देशांच्या परराष्ट्र दौऱ्यात सायरप्रसला पोहोचले; जाणून घ्या का खास आहे दौरा? (फोटो सौजन्य: @narendramodi)
पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचताच सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिस आणि परराष्ट्र मंत्री कॉन्स्टॅंटिनोस कोम्बोस यांची त्यांचे भव्य स्वागत केले.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या क्षणाचे सामायिक मूल्यांवर आणि ऐतिहासिक संबंध आणि विश्वासहार्य भागीदारी म्हणून केले.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, मी सायप्रसला पोहोचलो आहे. विमानतळावर माझे विशेष स्वागत करण्यात आले. याबद्दल मी अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांचे आभार मानको. या भेटीमुळे भारत-सायप्रस संबंधांना, व्यापर गुंतवणूक आणि इतर क्षेत्रात महत्वपूर्ण चालना मिळले.
Landed in Cyprus. My gratitude to the President of Cyprus, Mr. Nikos Christodoulides for the special gesture of welcoming me at the airport. This visit will add significant momentum to India-Cyprus relations, especially in areas like trade, investment and more.@Christodulides pic.twitter.com/szAeUzVCem
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2025
या वेळी पंतप्रधान मोदी अध्यक्ष क्रिस्टोडौलिड्स यांच्याशी एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. लिमासोलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. तसेच याबैठकीत व्यापारी समुदायाच्या अधिकाऱ्यांचीही भेट नरेंद्र मोदी घेणार आहे. डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण, शिक्षण पर्यटन, हवामान आणि संस्कृीत या विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि सायप्रसमधील संबंध वाढवण्यावर चर्चा होणार आहे.
सायप्रस हा भूमध्य सारगरी प्रदेश आहे. हा प्रदेश युरोपियन युनियनमध्ये भारताच्या जवळचा मित्र आणि महत्त्वाचा भागीदार ओळखला जातो. भारत आणि सायप्रसमधील संबंध गेल्या ६० वर्षांपासून अधिक बळकट आहे. दोन्ही लोकशाही देश, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीय सहकार्य अशा सामायिक मूल्यांवर विश्वास ठेवतात.
सायप्रसला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाला रवाना होतील. कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दिलेल्या G-7 परिषदेसाठीच्या आमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी कॅनडाला जात आहे. परंतु सध्या कॅनडात खलिस्तानी समर्थकांच्या भारतविरोधी आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण आहे. या भेटीनंतर क्रोएशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.