Strong earthquake in iran amid tension with Israel
Iran Earthquake News Marathi : सध्या इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. याच तणावादरम्यान इराणला भूकंपाचा मोठा झटका बसला आहे. इराणमध्ये भूकंपाचे तीव्र झटका जाणवला. इराणच्या सेमनान प्रदेशात शुक्रवारी (२० जून) रात्री ९ च्या सुमारास ५.१ तीव्रतेचा भूकंपाचा झटका जाणवला. या भूंकपाची खोली १० किमीपर्यंत होती. यामुळे तेहरानसह अनेक भागांमध्ये याचा परिणाम जाणवला.
यापूर्वी देखील १५ जून रोजी इराणच्या फोर्डोजवळ भूकंपाचा झटका जावणाला होता. याची तीव्रता २.५ इतकी नोंदवण्यात आली. इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही झटके जाणवले असल्याचे सांगण्यात आले आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, इराण अल्पाइन हिमालयीन भूपंकपाच्या पट्टीवर स्थित आहे. या भागात दरवर्षी सरासरी २००० हून अधिक भूकंपाटे झटके जाणवतात. यातील काही भूकंप ५ रिश्टर स्केल हून अधिक तीव्र असतात. आतापर्यंत इराणमध्ये ९६ हजारांहून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
USGS आणि CTBTO या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या अणु चाचण्यांमुळे हे भूंकप होत असल्याचे मानले जात आहे. परंतु या भूकंपाची तीव्र स्फोटांपेक्षा कमी आहे. यामुळे काही किलोमीटपर्यंतच याची तीव्रता आहे. अणु चाचण्यांमुळे भूकंपाच्या लहरी तयार होत आहे. यामुळे अणुचाचण्या अशाच सुरु राहिल्या तर गंभीर भूकंपाची देखील भीती निर्माण होते असे तज्ञांनी म्हटले आहे.
मात्र बर्कले सिस्मोलॉजी लॅब आणि नॅशनल जिओग्रापिकच्या माहितीनुसार, भूकंपीय लाटांचे सध्या विश्लेषण सुरु आहे. CTBTO च्या भूकंपशास्त्रज्ञ यावर काम करत आहे. इराणमधील भूकंपांचा अणु चाचणी किंवा लष्करी हल्ल्यांशी सध्या कोणताही ठोस संबंध असल्याचे दिसून आलेले नाही. परंतु सध्या इराणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु इराणने आपल्या नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे निर्देेश दिले आहेत. तसेच भूकंपासंबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगतिले आहे.
तर एकीकडे इस्रायलने नतान्झ,. इस्पहान आणि फोर्डोसारख्या अणुस्थळांवर हल्ल्या केल्याच्या बातम्या समोर येत आहे, परंतु इराणने त्यांच्या अणु प्रकल्पांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे म्हटले आहे. सध्या दोन्ही देशांतील युद्ध अधिक तीव्र झाले आहे. जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण आहे.