Israel Iran War : इस्रायल हवाई संरक्षण यंत्रणा धोक्यात? कारगिलचे ऋण फेडणार का भारत? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War news marathi : जेरुसेलम : सध्या इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. अशातच इस्रायल मोठ्या संकटात अडकलेला आहे. इराणच्या सततच्या हल्ल्यामुळे इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेत संकट निर्माण झाले आहे. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. इस्रायल एकचा वेळी हमास, इराण अशा दोन अघाड्यांवर युद्ध लढत आहे. याच वेळी इस्रायलने केलेल्या कारगिल युद्धातील मदतीचे भारत ऋण फेडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. हा अहवाल अशा वेळी आला आहे, जेव्हा इस्रायल आणि इराणमधील युद्ध अधिक तीव्र झाले आहे. अशाच परिस्थितीत इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेवर इराणकडून हल्ला होण्याची शक्यता आहे.
इस्रायलला लांब पल्ल्याच्या इंटरसेप्टर मिसाइल्सचा पुरवठा कमी पडत आहे. शिवाय इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आयर्न डोम, डेव्हिड स्लिंग, ARROW आणि अमेरिकेची पॅट्रियट- THAAD यंत्रणा देखील अपुरी पडत आहे. यामुळे इस्रायल मोठ्या संकटात अडकला आहे. एका रात्रीच्या संरक्षणाची किंमत सुमारे २८५ दशलक्ष डॉलर्स आहे.
शिवाय इराणकडून आतापर्यंतच्या हल्ल्यात ४०० बॅलेस्टिक क्षेपणास्रे डागण्यात आली आहे. यापैकी जवळपास २०० हून अधिक क्षेपणास्रांनी इस्रायलचे नुकसान केले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या इराणकडे १००० हून अधिक क्षेपणास्रे आहेत. सध्याच्या परिस्थितीत इस्रायलकडे १० ते १२ दिवसांसाठीच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची क्षमता आहे. अशा परिस्थिती भारत या युद्धात इस्रालयच्या मदतीसाठी धावेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भारताने इस्रायल आणि इराणमध्ये तटस्थ भूमिका ठेवली आहे. दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. यामुळे भारत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे यामध्ये सहभागी होणार नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताने कोणत्याही संघर्षात स्वत:ला अडकवू इच्छित नाही हे स्पष्ट केले आहे. भारताने इस्रायलला मदत केल्यास यामुळे भारताचे केवळ इराशीच नव्हे तर आखाती देशांशी असलेले द्विपक्षीय संबंध देखील बिघडण्याची शक्यता आहे.
परंतु इतिहास पाहता १९९९ च्या कारगिल युद्धात भारताला इस्रायलने मदत केली होती.इस्रायलने भारताला लेझर-गाईडेड बॉम्ब, २००० लढाऊ विमाने पुरवली होती.आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलवर दबावही आणला होता, परंतु या दबावाला बळी न पडता भारताला इस्रायलने मदत केली होती. परंतु सध्या भारताची आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणातील परिस्थिती पाहता मदत करण्यापूर्वी भारत विचारपूर्वक निर्णय घेऊल हे निश्चित आहे.
इमॅन्युएल मॅक्रोनवर का वैतागल्या जॉर्जिया मेलोनी? दोघांमधील खुसफूस कॅमेऱ्यात कैद.. पाहा VIDEO