Israel launches major airstrike on Gaza
जेरुसेलम: एक मोठी बातमी समोर येत आहे. युद्धबंदीच्या काळत इस्त्रायलने गाझावर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु केले आहेत. मंगळवारी (18 मार्च) सकाळी इस्त्रायलने हवाई हल्ला केल्याने संपूर्ण गाझा पट्टी हादरली आहे. युद्धविराम करार झाल्यानंतर हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यामुळे गाझात पुन्हा एकदा रक्तरंजित खेळ सुरु झाला आहे. या हल्ल्या हमासच्या मंत्री आणि ब्रिडेडियरसह 250 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे इस्त्रायल-हमासमधील संघर्षविराम मोडला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गाझातील गृह आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयातील संघटना आणि प्रशासन प्राधिकरणाचे प्रमुख, हमासचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडियर बहजत, तसेच इतरही अनेक अधिकारी हल्ल्यात ठार झाले आहेत.
Israeli Army Radio Quoted A Senior Israeli Official As Saying:
THE CEASEFIRE IN GAZA HAS ENDED
Injuries have arrived at Nasser Hospital, including children, due to an attack in Khan Younis, south of the Gaza Strip.Israel has resumed attacks on civilians https://t.co/gc3tH8HPZD
— Burhan Naji (@burhan_nage99) March 18, 2025
युद्धविरामचा दुसऱ्या टप्प्यातील कोणताही करार झाला नाही
इस्त्रायल-हमासमधील युद्धनविराम करारांतर्गत 42 दिवसांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील अटी स्वाकरण्यास इस्त्रायलने नकार दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा युद्धबंदीची चर्चा सुरु झाली होती. इस्त्रायलचे पंतप्रधान यांनी हमासला सर्व बंधकांना सोडण्याचा वारंवार इशारा दिला होता, मात्र हमासने नकार दिल्याने शांतता चर्चा अपयशी ठरली.
इस्त्रायलने हमासच्या नकारानंतर मोठा हवाई हल्ला करण्याचा निर्णय घेतला. इस्त्रायलने यासंबंधित एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “इस्त्रायल आता आपली लष्करी ताकद वाढणार आहे आणि हमासविरुद्ध हल्ले तीव्र करणार आहे.
निरापराध लोकांवर हत्या
हमासच्या एका अधिकाऱ्या इस्त्रायलच्या या हल्ल्यांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय समुदायच्या नैतिकतेची परिक्षा घेतली जात आहे. तसेच गुन्ह्यांना परत करण्याची परवानगी दिली जाक आहे, या हल्ल्यांमुले गाझातील निष्पाप लोकांची हत्या होत आहे. गाझावर ताबा मिळवण्यासाठी निष्पाप लोकंविरुद्ध आक्रमकता दिसून येत आहे.