Terror In PaK: पाकिस्तानाला दहशवादी देत आहेत घराचा आहेर! केला अब्दुल बाकी यांचा हाय प्रोफाइल हत्याकांड (फोटो सौजन्य: एक्स अकाउंट/@Arzookazmi30)
इस्लामाबाद: पाकिस्तानातून आणखी एक हत्याकांडाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या क्वेटा येथे रविवारी (16 मार्च) रात्री एका हाय प्रोफाइल व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. जमियत उलेमा-ए-इस्लामच्या (JUI) वरिष्ठ नेत्याला अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. क्वेटायेथील विमानतळावर काही बंधूकधारकांनी अब्दुल बाकीवर गोळ्या झाडल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाकिस्तानी आरजू काझमी यांनी अब्दुल बाकी यांच्या मृत्यूचा दावा केला आहे. मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. पत्रकार आरजू काझमी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे या घटनेची माहिती दिली. त्यांनी पोस्टवर लिहिले की, “विमानतळावर अज्ञात हल्लेखोरांकडून मुफ्ती अब्दुल बाकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.’
🚨Mufti Abdul Baqi Noorzai was killed when some armed men opened fire at him at the #Quetta airport on Sunday night. #UnknownGunMan pic.twitter.com/sU5OjVuP8d
— Arzoo Kazmi|आरज़ू काज़मी | آرزو کاظمی | 🇵🇰✒️🖋🕊 (@Arzookazmi30) March 16, 2025
हल्ल्याचा तपास सुरु
या घटनेवर पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, क्वेटामधील एअरपोर्ट रोडवर मुफ्ती अब्दुल बाकी यांची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी गोळीबारानंतर तेथून पळ काढला. सध्या सुरक्षा दल या हल्ल्याचा तपास करत आहे. हा हल्ला कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दहशतवादाचे वाढत प्रमाण
गेल्या काही काळापासून पाकिस्तानात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेसच हायजॅक केली होती. यात 214 पाकिस्तानी सैनिकांसह 426 प्रवासी होते. या अपहरणात 60 हून अधिक सैनिक मारले गेले असून अनेक लोकांना ओलिस ठेवण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने सर्व ओलिसांची सुटाका केली.
पाकिस्तानी लष्करावरील हल्ला
तसेच एक दिवसापूर्वीच क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात लष्कराच्या सात लष्करी सैनिकांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) ने घेतली असून 90 पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूचा दावा त्यांनी केला आहे.