बांगलादेशात अमेरिकन गुप्तचर प्रमुखांचे खळबळजनक विधान; उमटल्या तीव्र प्रतिक्रिया अन् रोष (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारावरुन पुन्हा एकदा मोठे वादंग उभे राहिले आहे. अमेरिकन गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी केलेल्या विधानावरुन मोहम्मद युनूस सरकार संतापले आहे. त्यांनी हे विधान अशा वेळी केले आहे, जेव्हा त्या रायसीना डायलॉग या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान त्यांनी बांगलादेशमधील हिंदू व इतर अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि हत्यांचा मुद्दा उपस्थित करत चिंता व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या तुलसी गबार्ड?
तुलसी गबार्ड यांनी म्हटले आहे की, “बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार आणि त्यांची हत्या , त्यांच्यावर होणारे अन्याय हे अमेरिका आणि डोन्लाड ट्रम्प प्रशासनासाठी गंभीर चिंतेचे कारण आहे.” तसेच बांगलदेशमध्ये इस्लामिक दहशतवाद वाढत असून हे दहशतवादी बांगलादेशात ‘इस्लामिक खिलाफत’ स्थापनेच्या प्रयत्नात आहे. त्यांनी पुढे म्हटले की, “इस्लामिक दहशतवादी गट संपूर्ण जगावर इस्लामी राजव्यवस्ता लादण्याच्या उद्देशाने काम करत आहेत. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद्यांविरोदात ठाम भूमिका घेत त्यांना संपुष्टात अणण्याचा प्रयत्न करत आहेत.”
बांगलादेशच्या युनूस सरकारचा तीव्र आक्षेप
बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या अंतरिम सरकारने तुलसी गबार्ड यांच्या हिंदूंवरील अत्याचार आणि हत्याच्या, तसेच दहशतवादावरील वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. बांगलादेशने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “तुलसी गबार्ड यांचे हे विधान बांगलादेशच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आहे. आमचा देश नेहमीच शांतताप्रिय आणि समावेशक इस्लामिक परंपरेचा भाग राहिला आहे. आम्ही दहशतवाद आणि अतिरेक्यांविरोधी लढण्यास वचनबद्ध आहोत.”
बांगलादेशच्या सरकारने तुलसी गबार्ड यांचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे. बांगलादेशने म्हटले आहे की, सध्या संपूर्ण जग दहशतवाद्याचा सामना करत आहे आणि बांगलादेश या उग्रवादाविरोधात लढाईत अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय भागीदांरासोबत कार्य करत आहोत. मात्र या मुद्द्यावरुन अमेरिका आणि बांगलादेशात राजनैतिक तनाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
अल्पसंख्याकाच्या मुद्दयावरुन भारत-बांगलादेशतही वाद
बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा हा भारतासाठी संवेदनशील विषय आहे. दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याने या प्रश्नावर मार्ग काढण्याची गरज आहे. भारताच्या भूमिकेचा उद्देश शेजारील राष्ट्राच्या स्थैर्याबद्दल चिंता व्यक्त करणे आहे, तर बांगलादेश आपल्या स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करत आहे. त्यामुळे, दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून या वादाला सुयोग्य तोडगा काढावा, हाच परस्पर संबंध टिकवून ठेवण्याचा उत्तम मार्ग ठरू शकतो.