गाझावरील सततच्या हल्ल्यांदरम्यान इस्रायलकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी रविवारी जाहीर केले की त्यांच्या सरकारने अल-जझीरा (Al Jazeera) वृत्तवाहिनीचं कार्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायल सरकारने मतदानाद्वारे हा निर्णय घेतला. अल-जझीरा वृत्तवाहिनी कतारी प्रसारकाद्वारे चालविली जाते. नेतन्याहू यांनी चॅनेलची कार्यालये कायमस्वरूपी बंद केली जात आहेत की ती मर्यादित कालावधीसाठी असतील याची माहिती दिली नाही.
[read_also content=”लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर फेकली बाटली, व्हिडिओ व्हायरल; लोकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केला संताप https://www.navarashtra.com/movies/bottel-thrown-on-singer-sunidhi-chauhan-in-live-concert-in-dehradun-video-viral-nrps-529991.html”]
बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्विटरवर कळवले की त्यांच्या सरकारने कतारच्या मालकीचे ब्रॉडकास्टर अल जझीराचे देशातील कार्यालये बंद करण्यासाठी एकमताने मतदान केले आहे.
הממשלה בראשותי החליטה פה אחד: ערוץ ההסתה אל ג׳זירה ייסגר בישראל. תודה לשר @shlomo_karhi — Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) May 5, 2024
इस्रायलचे दळणवळण मंत्री श्लोमो करही यांनी सांगितले की, या आदेशावर त्वरित अंमलबजावणीसाठी स्वाक्षरी करण्यात आली आहे. आमचे आदेश तात्काळ लागू होतील. अल जझीरावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांवर मात करण्यासाठी बराच वेळ घालवला गेला आहे. ते म्हणाले की, अल जझीरा हे भडकावण्याचे यंत्र बनले आहे. याला आळा घालण्यासाठी सर्व अडथळे तातडीने दूर करण्यात आले आहेत. यामुळे राज्याच्या सुरक्षेला धक्का बसत आहे.
वास्तविक, इस्रायलने गाझा युद्धात अल-जझीरा वाहिनीवर पक्षपाती वार्तांकन केल्याचा आरोप केला आहे. चॅनल आणि नेतान्याहू सरकारमधील संबंध फार पूर्वीपासून ताणले गेले आहेत. गाझा युद्धादरम्यान अल-जझिराने गाझामधील भीषण परिस्थिती आपल्या वाहिनीवर प्रसारित केली. अल जझीराने इस्रायलवर अत्याचार केल्याचा आरोप करून हवाई हल्ले आणि गर्दीने भरलेल्या रुग्णालयांची ग्राफिक प्रतिमा प्रसारित केली. इस्रायलने अल जझिरावर हमाससोबत काम केल्याचा आरोप केला आहे. या वृत्तवाहिनीचे प्रसारण मुख्यालय दोहा आहे. कतारी सरकार यासाठी निधी देते.






