वर्षानुवर्षे केलेली मेहनत काही मिनिटांतच गेली वाया! इस्रायलने इराणचा एकमेव पाणबुडी तळ उडवला; 'अल-अमाना' इंधन केंद्र उद्ध्वस्त ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Israel destroys Iran submarine base Isfahan : मध्य-पूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता एका अशा भीषण वळणावर पोहोचले आहे, जिथे इस्रायलने इराणच्या अस्तित्वावरच घाला घालण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारची रात्र इराण आणि लेबनॉनसाठी काळरात्र ठरली. इस्रायली हवाई दलाने (IAF) अत्यंत अचूक गुप्त माहितीच्या आधारे इराणच्या लष्करी शक्तीचा कणा असलेल्या इस्फहान येथील पाणबुडी उत्पादन केंद्रावर भीषण हल्ला केला. या एका हल्ल्याने इराणने गेल्या कित्येक वर्षांपासून नौदलात वर्चस्व मिळवण्यासाठी केलेली मेहनत मातीत मिसळली आहे.
इराणमधील इस्फहान हे शहर लष्करी दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानले जाते. याच ठिकाणी इराणचे एकमेव लष्करी पाणबुडी प्रणाली संशोधन आणि विकास केंद्र होते. इस्रायल डिफेन्स फोर्सच्या (IDF) मते, हे इराणमधील असे एकमेव ठिकाण होते जिथे आधुनिक पाणबुड्यांची रचना आणि निर्मिती केली जात होती. इतकेच नाही, तर या केंद्रात इस्रायलला समुद्रातून धोका निर्माण करू शकणारी ‘मानवरहित जहाजे’ (Unmanned Vessels) देखील बनवली जात होती. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी या केंद्रावर इतका अचूक निशाणा साधला की, आता इराणला नवीन पाणबुडी तयार करणे किंवा जुन्या पाणबुड्या दुरुस्त करणे पुढील अनेक वर्षे शक्य होणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: मोठा दिलासा! अखेर इराणने होर्मुझचं दार उघडलं; भारत आणि ‘या’ देशांना LPG आणि Oil नेण्यासाठी फ्री एन्ट्री
इस्रायलने केवळ इराणलाच नाही, तर लेबनॉनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हिजबुल्लाहलाही मोठा दणका दिला आहे. लेबनॉनची राजधानी बैरुतमधील दहिया भागात असलेल्या हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलने बॉम्बचा पाऊस पाडला. या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते ‘अल-अमाना’ इंधन केंद्रे. ही इंधन केंद्रे केवळ पेट्रोल भरण्यासाठी नव्हती, तर ती हिजबुल्लाहची ‘दुभती गाय’ होती. या केंद्रांतून मिळणारा लाखो डॉलर्सचा नफा हिजबुल्लाह आपल्या दहशतवादी कारवायांसाठी वापरत असे. तसेच, इराणकडून येणारी शस्त्रे ज्या ट्रकमधून वाहतूक केली जातात, त्यांना इंधन पुरवण्यासाठी या केंद्रांचा वापर व्हायचा. आता हे सर्व इंधन डेपो जळून खाक झाल्याने हिजबुल्लाहची रसद पूर्णपणे कापली गेली आहे.
🚨 BREAKING: ISRAEL STRIKES KEY IRANIAN TARGETS IN TEHRAN
The Israeli Air Force has carried out multiple waves of airstrikes over Tehran, targeting Iranian regime military infrastructure, according to the IDF. • Strikes focused on strategic regime-linked sites in the capital
•… pic.twitter.com/EIwyFvUkmw — Mossad Commentary (@MOSSADil) March 25, 2026
credit – social media and Twitter
इस्रायलने या हल्ल्यांचे समर्थन करताना एक अत्यंत धक्कादायक आरोप केला आहे. इस्रायलच्या मते, हिजबुल्लाह मुद्दाम आपली लष्करी ठाणी, शस्त्र साठे आणि इंधन केंद्रे ही निवासी वस्त्यांमध्ये आणि सामान्य नागरिकांच्या घराशेजारी बनवते. जेव्हा इस्रायल या तळांवर हल्ला करतो, तेव्हा सामान्य नागरिक मारले जावेत आणि जागतिक स्तरावर इस्रायलची प्रतिमा डागाळली जावी, हा हिजबुल्लाहचा मुख्य हेतू असतो. लेबनीज नागरिकांना ‘मानवी ढाल’ म्हणून वापरणे हा युद्धगुन्हा असल्याचे आयडीएफने म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट
इराणने गेल्या दशकात आपली नौदल ताकद वाढवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले होते. मात्र, इस्रायलच्या एका हवाई मोहिमेने या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले आहे. इराणचा हा पाणबुडी तळ उद्ध्वस्त झाल्यामुळे अरबी समुद्र आणि पर्शियन आखातात इराणचे वर्चस्व कमी होईल. इस्रायलने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जोपर्यंत इस्रायलला असलेला धोका पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत इराणशी संबंधित लष्करी उद्योगांवर असेच हल्ले सुरू राहतील.
Ans: इस्रायलने इराणमधील इस्फहान (Isfahan) येथील एकमेव लष्करी पाणबुडी उत्पादन आणि संशोधन केंद्रावर हल्ला केला.
Ans: अल-अमाना ही हिजबुल्लाहच्या मालकीची कंपनी असून या इंधन केंद्रांमधून संघटनेला दहशतवादी कारवायांसाठी लाखो डॉलर्सचा नफा मिळत असे.
Ans: इराणची नवीन पाणबुड्या तयार करण्याची आणि विद्यमान ताफा अद्ययावत करण्याची क्षमता आता पूर्णपणे नष्ट झाली आहे, ज्यामुळे त्यांची नौदल ताकद कमी झाली आहे.






