
Israel PM on Bondi Beach Attack
काय आहे हनुक्का फेस्टिवल? सिडनीतील यहूदींवरील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर होतोय ट्रेंड
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अँथनी अल्बानीज यांच्यावर थेट हल्ला केला आहे. नेतन्याहूंनी दावा केला आहे की, ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र राष्ट्रासाठी दिलेल्या मान्यतेमुळे यहूदीविरोधी हल्ले वाढत आहे. त्यांनी म्हटले की, ‘मी आधीच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना इशारा दिला होता, पॅलेस्टिनी राज्याला समर्थन करणे म्हणजे यहूदीविरोधी हिंसाचाराला खतपाणी घालण्यासारखे आहे. सिडनीत यहूदींवरील झालेला गोळीबार हा यामुळेच झाला असल्याचे नेतन्याहूंनी म्हटले आहे.
नेतन्याहूंनी असाही दावा केला की, गाझा युद्धानंतर आणि पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र राष्ट्राला मान्यता दिल्यानंतर ज्यू समुदायावरील हल्ल्यांचे प्रमाण अधिक वाढले आहेत. पॅलेस्टिनी राज्याला मान्यता, इस्रायलवरील आंतरराष्ट्रीय टीका या कारणांमुळे हिंसेला समर्थन मिळत असल्याचे नेतन्याहूंचे म्हणणे आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान सप्टेंबर २०२५ मध्ये पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र राज्याला मान्यता दिली होती. सध्या जगभरातील १५९ देशांनी पॅलेस्टिनींच्या राज्याला मान्यता दिली आहे. या देशांचा विश्वास आहे की इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघर्षाचा तोडगा हा दोन-राष्ट्रांच्या स्वतंत्रतेनंतरच निघेलय मात्र इस्रायलने हा निर्णय त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. बेंजामिन नेतन्याहूंनी याला तीव्र विरोध केला आहे.
दरम्यान सिडनीमधील बोंडी बिचवर झालेल्या सामूहिक गोळीबाराने संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्याना भारत, अमेरिका, इराण, ब्रिटन यांसारख्या राष्ट्रांनी तीव्र विरोध केला आहे. याच वेळी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी देखील हा हल्ला धोकादायक असल्याचे म्हटले आहे. यहूदीं त्यांच्या पवित्र सण हनुक्काचा उत्सव साजरा करत असताना हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन पाकिस्तानी नागरिकाचा बाप-लेकाचा समावेश असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने म्हटले आहे.
Ans: