काय आहे हनुक्का फेस्टिवल? सिडनीतील यहूदींवरील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर होतोय ट्रेंड (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
सध्या सिडनीतील बोडीं बीचवर यहूदींच्या फेस्टिव्हल दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु आहे. लोक हनुक्का फेस्टिव्हबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा करत आहे. या हल्ल्यानंतर लोक हनुक्का फेस्टिव्हल बद्दल सोशल मीडियावर अधिक माहिती शोधत आहे.
यहूदी धर्मातील एक पवित्र सण म्हणजे हनुक्का आहे. याला रोशनची पर्व किंवा प्रकाशाचा सण असेही म्हटले जाते. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मनला जातो. यंदा या सणाची सुरुवात १४ डिसेंबर २०२५ रोजी सुरु झाली आहे. हा आठ दिवसांचा सण असून ज्यू (यहूदी) समुदायाचाद्वारे मोट्या उत्सवाता साजरा केला जातो. २२ डिसेंबर रोजी सूर्यास्तासोबत हा सण समाप्त होतो. हा सण यहूदी धर्माची ओळख मानला जातो. श्रद्धा, चिकाटी आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हा उत्सव असतो.
या सणाच्या काळात ज्यू समुदायाचे लोक अनेक पारंपारिक विधी आणि आनंदोत्सव साजरे केला जातात.
दिप प्रज्वलन किंवा मेनोराह प्रज्वलण : या सणाच्या दिवसात प्रत्येक रात्री ज्यू कुटुंबे नऊ शाखा असलेली मेनोरोह (दिव्यांचा कंदील) पेटवतात. प्रत्येक दिवशी एक दिवा प्रज्वलित केला जातो आणि प्रार्थना केली जाते. ह मेनोराह खिडकीत ठेवली जाते, ज्यातून प्रकाशाचा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचेल.
ड्रेडल खेळ : या खेळाचा आनंद सहसा लहान मुले लुटतात. यावेळी लहान मुले हिब्रू अक्षरे नन, गिमेल आणि हेई आणि शिन अशी लिहिलेली असतात.
पारंपारिका खाद्यापदार्थ : याशिवाय या फेस्टिव्हल दरम्यान तेलात तळलेले पदार्थ खाल्ले जाता, ज्यामध्ये लाटकेस(बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक्स) आणि सुफगानियोट(जेलीने भरलेले डोनट्स) असतात.
भेटवस्तू : हा फेस्टिव्हल यहूदी मुलांसाठी आनंदाचा उत्सव असतो कारण या वेळी मुलांना भेटवस्तू आणि हनुक्का हेल्ट म्हणजे चॉकेलट, पैसे दिले जातात.
सिडनीच्या बोंडी बीचवर हनुक्का उत्सावादरम्यान दोन पाकिस्तानी नागरिकांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात १६ मृत्यूमुखी पडले असून ४० जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे लोक हनुक्का उत्सव, बोंडी बीच घटना आणि यहुदी परंपरांबाबत माहिती शोधत आहे. सध्या हनुक्का फेस्टिव्हलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.






