Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holy Sepulchre: जेरुसलेममध्ये धार्मिक युद्ध? अल-अक्सा नंतर आता ‘चर्च’वरही निर्बंध; ख्रिस्ती जगतात संताप अन् नेतन्याहू बॅकफूटवर

Diplomatic Tension: जेरुसलेममधील इस्रायली पोलिसांनी व्हॅटिकनचे कार्डिनल पियरबतिस्ता पिझाबाला यांना चर्च ऑफ द होली सेपल्करमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. शतकांतील ही अशा प्रकारची पहिलीच घटना होती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 30, 2026 | 11:59 AM
israel restricts church cardinal pizzaballa blocked jerusalem netanyahu backtracks 2026

israel restricts church cardinal pizzaballa blocked jerusalem netanyahu backtracks 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • चर्चमध्ये प्रवेशबंदी
  • राजनैतिक भूकंप
  • नेतन्याहूंचा ‘यू-टर्न’

Cardinal Pierbattista Pizzaballa blocked Israel : जेरुसलेम, जे जगातील तीन प्रमुख धर्मांचे श्रद्धास्थान मानले जाते, तिथे सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. अल-अक्सा मशिदीतील निर्बंधांनंतर आता इस्रायलने (Israel) ख्रिश्चन धर्मीयांच्या अत्यंत पवित्र स्थळावर, म्हणजेच ‘चर्च ऑफ द होली सेपल्कर’वर कडक निर्बंध लादले आहेत. या कारवाईचा सर्वात मोठा फटका व्हॅटिकनचे कार्डिनल पियरबतिस्ता पिझाबाला यांना बसला, ज्यांना पोलिसांनी चर्चमध्ये प्रवेश करण्यापासून मज्जाव केला. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेत अशा प्रकारे वरिष्ठ धर्मगुरूंना रोखण्याची ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण ख्रिस्ती जगतातून इस्रायलचा निषेध केला जात आहे.

नेमकं काय घडलं? ‘पाम संडे’चा तो वाद

रविवारी ‘पाम संडे’ (Palm Sunday) निमित्त ख्रिश्चन बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रार्थना आयोजित केल्या होत्या. जेरुसलेमच्या लॅटिन पॅट्रिआर्केटचे प्रमुख कार्डिनल पियरबतिस्ता पिझाबाला हे कोणत्याही औपचारिक मिरवणुकीशिवाय, अत्यंत साध्या पद्धतीने वैयक्तिक प्रार्थनेसाठी चर्चकडे जात होते. मात्र, इस्रायली पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले. व्हॅटिकनच्या म्हणण्यानुसार, कार्डिनल पिझाबाला हे गेल्या वर्षी पोप बनण्याच्या शर्यतीत असलेले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत. अशा मोठ्या पदावरील व्यक्तीला रोखल्यामुळे केवळ धार्मिकच नाही, तर राजनैतिक वादही उफाळून आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei: इराणच्या नव्या नेत्याचा इराकला गुप्त निरोप; भूमिगत नेत्याचा ‘तो’ संदेश VIRAL, ट्रम्प प्रशासनात मोठी अस्वस्थता

इटलीचा संताप आणि नेतन्याहूंचे स्पष्टीकरण

या घटनेचे पडसाद थेट युरोपमध्ये उमटले. इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो तायानी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून इस्रायली राजदूतांना तातडीने बोलावून जाब विचारला आहे. वाढता दबाव पाहून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना स्पष्टीकरण देण्यासाठी समोर यावे लागले. नेतन्याहू यांनी सांगितले की, “इराणकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ‘होम फ्रंट कमांड’ने कडक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत. हे निर्बंध केवळ एका धर्मासाठी नसून ओल्ड सिटीमधील ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या सुरक्षेसाठी आहेत.” मात्र, नंतर नेतन्याहू यांनी स्वतः हस्तक्षेप करत कार्डिनल यांना त्यांचे धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले.

Israel to draft “plan” to allow Catholic church leaders to worship after Latin Patriarchate of Jerusalem blocked from Church of the Holy Sepulchre on Palm Sundayhttps://t.co/hCRIcElV99 — Human Events (@HumanEvents) March 29, 2026

credit – social media and Twitter

धार्मिक स्थळांवरील निर्बंधांचे सत्र

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने जेरुसलेममधील गर्दीच्या ठिकाणांवर आणि धार्मिक स्थळांवर निर्बंध घातले आहेत. अल-अक्सा मशिदीत मुस्लिमांना प्रार्थनेसाठी येण्यावर आधीच कडक निर्बंध आहेत. आता ख्रिश्चन धर्मीयांच्या पवित्र स्थळांवरही अशाच प्रकारची कारवाई होत असल्याने, इस्रायल सरकार धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा आरोप जगभरातून होत आहे. जेरुसलेम हे ख्रिस्ती पर्यटनाचे जागतिक केंद्र असून, अशा घटनांमुळे तिथल्या पर्यटनावर आणि प्रतिमेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MQ9 Reaper: समुद्रात कोसळलं अमेरिकेचं ‘F-16’? US वायुदलाचं कंबरडं मोडलं; वाचा इराणच्या IRGCच्या ‘या’ VIRAL दाव्यामागचं सत्य

 जागतिक राजकारणावर परिणाम

इस्रायल सध्या इराण आणि हमाससोबत दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. अशातच ख्रिस्ती जगताला नाराज करणे इस्रायलला परवडणारे नाही. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देश ख्रिश्चन बहुल आहेत, त्यामुळे व्हॅटिकनची नाराजी नेतन्याहू सरकारसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. सुरक्षेचे कारण देऊन धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा हा वाद येत्या काळात अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कार्डिनल पियरबतिस्ता पिझाबाला यांना का रोखण्यात आले?

    Ans: इस्रायली पोलिसांनी सुरक्षेचे आणि इराणकडून असलेल्या संभाव्य धोक्याचे कारण देत त्यांना चर्चमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले होते.

  • Que: इटलीने या घटनेवर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: इटलीने याला 'अपमानजनक' मानत इस्रायली राजदूतांना पाचारण केले आणि तीव्र राजनैतिक निषेध नोंदवला.

  • Que: नेतन्याहू यांनी नंतर कोणती भूमिका घेतली?

    Ans: जागतिक दबाव वाढल्यानंतर नेतन्याहू यांनी माघार घेतली आणि कार्डिनल यांना धार्मिक विधी पूर्ण करण्याची विशेष परवानगी देण्याचे आदेश दिले.

Web Title: Israel restricts church cardinal pizzaballa blocked jerusalem netanyahu backtracks 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Israel
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Kharg Island : ‘आम्ही सत्तापालट घडवलाय!’ इराणच्या तेल साठ्यावरही ट्रम्पचा डोळा; खारग बेटावर अमेरिकेची ‘शह-काटशह’ नीती
1

Kharg Island : ‘आम्ही सत्तापालट घडवलाय!’ इराणच्या तेल साठ्यावरही ट्रम्पचा डोळा; खारग बेटावर अमेरिकेची ‘शह-काटशह’ नीती

Mojtaba Khamenei: इराणच्या नव्या नेत्याचा इराकला गुप्त निरोप; भूमिगत नेत्याचा ‘तो’ संदेश VIRAL, ट्रम्प प्रशासनात मोठी अस्वस्थता
2

Mojtaba Khamenei: इराणच्या नव्या नेत्याचा इराकला गुप्त निरोप; भूमिगत नेत्याचा ‘तो’ संदेश VIRAL, ट्रम्प प्रशासनात मोठी अस्वस्थता

World War 3: ‘जमिनीवर पाय ठेवला तर सैनिकांना जाळून मारू’, इराणच्या IRGC चा अमेरिकेला 30 मार्चचा ‘फायनल’ अल्टिमेटम
3

World War 3: ‘जमिनीवर पाय ठेवला तर सैनिकांना जाळून मारू’, इराणच्या IRGC चा अमेरिकेला 30 मार्चचा ‘फायनल’ अल्टिमेटम

LPG टंचाईतून देशाला दिलासा! 94,000 मेट्रिक टन गॅस घेऊन दोन महाकाय जहाजे भारताकडे रवाना; 31 मार्चला मुंबईत होणार दाखल
4

LPG टंचाईतून देशाला दिलासा! 94,000 मेट्रिक टन गॅस घेऊन दोन महाकाय जहाजे भारताकडे रवाना; 31 मार्चला मुंबईत होणार दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.