भूमिगत मुज्तबा खामेनी यांनी इराकला एक विशेष संदेश पाठवून जनतेला ही महत्त्वाची गोष्ट सांगितली, ज्यामुळे अमेरिकेतील तणाव वाढला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Mojtaba Khamenei latest message to Iraq : मध्य-पूर्वेतील युद्धाच्या (US-Israel Iran War) ज्वाळा अद्याप शमलेल्या नाहीत, पण आता रणांगणापेक्षा अधिक चर्चा इराणच्या नव्या नेतृत्वाची सुरू आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) इराणचे तिसरे सर्वोच्च नेते बनले खरे, पण ते जगासमोर आलेले नाहीत. नुकताच त्यांनी इराकी जनतेला उद्देशून एक लिखित संदेश जारी केला आहे. या संदेशाने केवळ इराकशी असलेल्या संबंधांवरच प्रकाश टाकला नाही, तर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात (पेंटागॉन) मोठी खळबळ उडवून दिली आहे.
इराणी माध्यमांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, मोजतबा खामेनी यांनी इराकचे सर्वोच्च धार्मिक नेते ग्रँड अयातुल्ला अली सिस्तानी आणि इराकी जनतेचे आभार मानले आहेत. इराणवर झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान इराकने दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल त्यांनी ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. मोजतबा यांनी या पत्रात शिया समुदायातील एकतेवर भर दिला आहे. विशेष म्हणजे, हा संदेश कोणत्या मार्गाने आणि कुठून पाठवला गेला, याची कोणतीही अधिकृत माहिती इराणने दिलेली नाही. यामुळे मोजतबा खामेनी सध्या कुठे लपले आहेत, याबद्दलचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MQ9 Reaper: समुद्रात कोसळलं अमेरिकेचं ‘F-16’? US वायुदलाचं कंबरडं मोडलं; वाचा इराणच्या IRGCच्या ‘या’ VIRAL दाव्यामागचं सत्य
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोजतबा खामेनी यांच्याबद्दल अत्यंत संशयास्पद विधान केले आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका सध्या इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करत आहे, पण तो अधिकारी मोजतबा खामेनी नक्कीच नाही. ट्रम्प यांनी उघडपणे म्हटले की, मोजतबा जिवंत आहेत की नाही, याची पुष्टी वॉशिंग्टनकडे नाही. ट्रम्प यांच्या या विधानामुळे इराणच्या सरकारी गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने असा दावा केला आहे की, मोजतबा हे इस्रायली हवाई हल्ल्यात झालेल्या जखमांमधून सावरत आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव ते समोर येत नाहीत.
#BREAKING | Mojtaba’s New Message, Days After Trump’s ‘Don’t Know If He’s Alive’ Claim Senior journalist Daniel Block (@dblock94) decodes Iran’s new supreme leader’s message@NewshoundArjun | #MojtabaKhamenei pic.twitter.com/sPiyR4ugAy — NDTV (@ndtv) March 30, 2026
credit – social media and Twitter
युद्धाच्या या भीषण परिस्थितीतही एक आशेचा किरण दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मान्य केले आहे की, पाकिस्तानच्या राजदूतांच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारात्मक दिशेने जात असून युद्धविराम (Ceasefire) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत अद्याप कोणताही ठोस करार झालेला नाही. इराण सध्या आपल्या नवीन नेत्याला सुरक्षित ठेवण्यावर भर देत आहे, तर अमेरिका इराणला पूर्णपणे शरण येण्यास भाग पाडत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘जमिनीवर पाय ठेवला तर सैनिकांना जाळून मारू’, इराणच्या IRGC चा अमेरिकेला 30 मार्चचा ‘फायनल’ अल्टिमेटम
मोजतबा खामेनी यांचा लिखित संदेश हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे की इराणचे नेतृत्व अजूनही सक्रिय आहे. मात्र, जोपर्यंत ते स्वतः कॅमेऱ्यासमोर येत नाहीत, तोपर्यंत ट्रम्प प्रशासन आणि पाश्चात्य माध्यमे त्यांच्याबद्दलच्या अफवा थांबवणार नाहीत. इराणसाठी हा काळ अत्यंत कसोटीचा आहे; कारण त्यांना एका बाजूला लष्करी हल्ल्यांचा सामना करायचा आहे आणि दुसरीकडे आपल्या नवीन नेत्याची प्रतिमा जपायची आहे.
Ans: त्यांनी इराणवर झालेल्या आक्रमणादरम्यान पाठिंबा दिल्याबद्दल इराकी जनतेचे आणि ग्रँड अयातुल्ला अली सिस्तानी यांचे आभार मानले आहेत.
Ans: ट्रम्प यांनी म्हटले की मोजतबा खामेनी जिवंत असल्याची कोणतीही खात्री त्यांच्याकडे नाही आणि अमेरिका सध्या दुसऱ्याच एका अधिकाऱ्याशी चर्चा करत आहे.
Ans: अधिकृत सूत्रांनुसार, ते इस्रायली हल्ल्यातील जखमांमधून सावरत आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव एका अज्ञात सुरक्षित ठिकाणी उपचार घेत आहेत.






