Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मागच्या सरकारने केलेल्या चुका टाळा…’; सीरियाच्या नव्या सरकारला कोणी दिला इशारा?

इस्त्रायलच्या पंतप्रधान नेतन्याहूंनी सीरियातील नव्या सरकारवर मोठे वक्तव्य केले आहे. नेतन्याहूंनी त्यांनी स्पष्ट केले की, जर नवीन सरकारने जुन्या सरकारसारख्या चुकांची पुनरावृत्ती केली, तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 11, 2024 | 11:48 AM
'मागच्या सरकारने केलेल्या चुका टाळा...'; सीरियाच्या नव्या सरकारला कोणी दिला इशारा?

'मागच्या सरकारने केलेल्या चुका टाळा...'; सीरियाच्या नव्या सरकारला कोणी दिला इशारा?

Follow Us
Close
Follow Us:

तेल अवीव: इस्त्रायलच्या पंतप्रधान नेतन्याहूंनी सीरियातील नव्या सरकारवर मोठे वक्तव्य केले आहे. नेतन्याहूंनी त्यांनी स्पष्ट केले की, जर नवीन सरकारने जुन्या सरकारसारख्या चुकांची पुनरावृत्ती केली, तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. नेतन्याहूंनी धमकी दिली आहे की, जर नवीन सरकारने इराणला हस्तक्षेप करण्याची मुभा दिली किंवा हिजबुल्लाहला शस्त्रपुरवठा सुरू ठेवला, तर इस्त्रायल शांत राहणार नाही आणि नवीन सरकार विरोधात आवश्यक ती पावले उचलेल.

सीरियाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही उद्देश नाही- नेतन्याहू

नेतन्याहू यांनी असेही म्हटले की, इस्त्रायलचा सीरियाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही उद्देश नाही. मात्र, देशाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे सर्व उपाय करण्याची तयारी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इस्त्रायलची हवाई सेना सीरियाच्या सोडलेल्या लष्करी तळांवर हल्ला करत आहे, जेणेकरून ते जिहाद्यांच्या ताब्यात जाऊ नयेत. नेतन्याहू यांनी ब्रिटिश हवाई सेनेच्या दुसऱ्या महायुद्धातील कृतीची उदाहरण म्हणून आठवण करून दिली. ब्रिटिशांनी विची फ्रान्सच्या तळांवर बमफेक केली होती, जेणेकरून ती शस्त्रे नाझींच्या ताब्यात जाऊ नयेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेतन्याहू प्रथमच भ्रष्टाचाराच्या आरोपांवर साक्ष देणार; ‘या’ तीन वेगवेगळ्या प्रकरणी पंतप्रधानांवर खटला सुरू

नेतन्याहूंनी मैत्रीची तयारी 

बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, इस्त्रायल सीरियाच्या नव्या सरकारशी संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे, परंतु जर नव्या सरकारने इराणला पुन्हा सीरियामध्ये स्थापन होऊ दिले, हिजबुल्लाहला शस्त्रे पुरवली किंवा इस्त्रायलवर हल्ला केला, तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. मागील सरकारच्या चुकांमुळे काय झाले, हे नव्या सरकारने लक्षात ठेवावे, असा स्पष्ट इशार नेतन्याहूंनी सीरियाच्या नवीन सरकराला दिला.

नव्या संधीसह नवे धोकेही 

रविवारी, सीरियामधील विद्रोह्यांनी दमास्कस ताब्यात घेतले आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद देश सोडून पळून गेले. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या असद यांच्या सत्तेचा अंत झाला. नेतन्याहू यांनी या घडामोडीचे स्वागत केले आणि त्याला मध्य पूर्वेसाठी एक ऐतिहासिक क्षण म्हटले. त्यांनी सांगितले की, असद यांच्या पतनामुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, पण मोठी आव्हानेही समोर आली आहेत.

यासंदर्भात त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, इस्त्रायल शांततेचा हात पुढे करतआहे. ड्रूझ, कुर्द, ख्रिश्चन आणि इतर मुस्लिमांना शांततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, सीरियाच्या लष्कराने सोडलेल्या तळांवर शत्रूने कब्जा करू नये, यासाठी त्यांनी इस्त्रायली लष्कराला ही ठिकाणे नियंत्रणात घेण्याचे आदेश दिले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- दक्षिण कोरिया ‘मार्शल लॉ’ प्रकरण; माजी संरक्षणमंत्र्यांनी केला ‘Underwear’ ने जीव देण्याचा प्रयत्न

Web Title: Israel syria relation benjamin netnyahu warns new government nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 11:47 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • Syria
  • world

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
3

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी;  हजारो जीव धोक्यात
4

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी; हजारो जीव धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.