Israeli forces fire on hungry Palestinians again, 27 dead
गेल्या अनेक महिन्यांपासून गाझातील लोकांना केल्या जाणाऱ्या मानवतावादी मदत बंद करण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलद्वारे चालवली जाणाऱ्या गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF)द्वारे मदत पुरवली जात आहे. परंतु याचा मदतीच्या वितरणावेळी चेंगराचेंगरी, गोळीबार आणि लूटमारीच्या घटना घडत आहेत. पुन्हा एकदा इस्रायली सैन्याने भुकेल्या पॅलेस्टिनींवर गोळीबार केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रफाहमधील मदत वितर केंद्रावर इस्रायली सैन्याने तिसऱ्यांदा गोळीबार केला आहे. यामुळे किमान २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ९० जण जखमी झाले आहेत. दक्षिण गाझाच्या ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन मदत केंद्राजवळी ही घटना घडली आहे.
इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींवर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील २८ मे रोजी इस्रायलाी सैन्याने गोळीबार केला होती. या गोळीबारात ३ लोकांचा मृत्यू तर ४६ जण जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा १ जून रोजी केलेल्या गोळीबारात ३० जणांचा मृत्यू आणि ११५ हून अधिक जखणी झाले होते. गाझाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यामुळे शेकोड लोकांचा मृत्यू होत असल्याचे गाझाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, त्यांच्या गोळीबार करण्यामागे, अनेक संशयित लोक मदत केंद्रांकडे जात असलेल्या मार्गावरुन भटकले होते. लष्कराने सांगतिले की, काही संशयित घटनास्थळापासून ५०० मीटर लांबा अंतरावर होते. यामुळे सैन्याने गोळीबार केला. याशिवाय, मृतांचा आकड्याची ते तपासणी करत आहे.
🚨BREAKING : Thousands of starved Gazans stormed the dystopian Israeli-American aid complex in west Rafah after being forced to stand in endless queues under the scorching sun inside a fenced camp, subjected to biometric surveillance.
The US-Israeli backed “Gaza Humanitarian… pic.twitter.com/DaYbaOblxb
— Gaza Notifications (@gazanotice) May 27, 2025
गाझाच्या राज्य माध्यम कार्यलयाने इस्रायली सैन्याच्या या कृत्याला “एक भयानक, जाणूनबुजून वारंवार केलेला गुन्हा” म्हणून वर्णन केले आहे. उपासमारीने त्रासलेले पॅलेस्टिनींना मदतीच्या बहाण्याने बोलावून त्यांच्यावर हल्ला केल्या जात आहे. तसेच इस्रायल संयुक्त राष्ट्र आणि इतर मदत संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीवर नियंत्रण ठेवत आहे. यासाठी इस्रायल हे भायनक कृत्य करत आहे.
सध्या संपूर्ण जगभरातून इस्रायलच्या या कृतीला तीव्र विरोध केला जात आहे. अनेकांनी इस्रायलकडे गाझातील कारवाया बंद करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हमासने देखील कायमस्वरुपी युद्धबंदीची मागणी केली आहे.