A new chapter in India-Japan space cooperation begins; ISRO's strong partnership with JAXA for Chandrayaan-5
Space Company JAXA : भारत आणि जपान यांच्यातील अंतराळ क्षेत्रातील सहकार्याला एक नवा आयाम मिळत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) आणि जपानची अवकाश संस्था JAXA (Japan Aerospace Exploration Agency) यांच्यात चांद्रयान-५ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी तयार झाली आहे. दोन्ही देश आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संयुक्त मोहिम राबवण्याच्या तयारीत आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की आणि अझरबैजानसारख्या देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवत, भारताने आपल्या अंतराळ क्षेत्रात आक्रमक भूमिका घेतली आहे. चंद्र मोहिमेच्या माध्यमातून भारत जागतिक पातळीवर तांत्रिक आणि सामरिक बळकटपणा दाखवत आहे.
JAXA ही जपानची राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे. तिचे संपूर्ण नाव Japan Aerospace Exploration Agency असून ती अंतराळ संशोधन, उपग्रह प्रक्षेपण, चंद्र आणि लघुग्रह शोध मोहिमा तसेच एरोस्पेस तंत्रज्ञानाच्या विकासासाठी ओळखली जाते. ही संस्था २००३ मध्ये ISAS, NASDA आणि NAL या तीन जपानी संस्थांच्या विलीनीकरणातून स्थापन झाली. तिचे मुख्यालय चोफू, टोकियो येथे आहे. JAXA ने आजवर अनेक ऐतिहासिक अंतराळ मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भीतीमुळे पाकिस्तानी सैन्याचे धाबे दणाणले; बलुचिस्तान नियंत्रणाबाहेर अन् स्वातंत्र्याची घोषणा
JAXA च्या SLIM (Smart Lander for Investigating Moon) मोहिमेने १९ जानेवारी २०२४ रोजी यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून जपानला चंद्रावर लँडिंग करणारा जगातील पाचवा देश बनवले. यापूर्वी २००३ मध्ये त्यांच्या H-IIA रॉकेटचे पहिले प्रक्षेपण अपयशी गेले होते, मात्र त्यानंतर त्यांनी सलग ४७ यशस्वी प्रक्षेपणांची नोंद केली आहे. या अनुभवामुळे JAXA ही भारतासाठी एक आदर्श सहकारी संस्था ठरली आहे, विशेषतः चंद्राच्या कठीण दक्षिण ध्रुवावरील मोहिमा हाती घेताना.
ISRO आणि JAXA यांच्यातील संयुक्त मोहिमेचे नाव आहे LUPEX (Lunar Polar Exploration Mission). ही मोहिम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर पाठवून तिथले पाण्याचे अस्तित्व, मातीचा संरचना अभ्यास आणि दीर्घकालीन लँडिंग प्रणालींची चाचणी घेण्यासाठी राबवली जाणार आहे. इस्रोने नुकतीच या मोहिमेसंदर्भात JAXA सोबत तिसरी प्रत्यक्ष बैठक घेतली असून त्यात तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा झाली आहे. चांद्रयान-५ मोहिमेअंतर्गत LUPEX चे प्रक्षेपण होणार असून, ही मोहिम 2030 पूर्वी यशस्वी करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.
भारताने आजवर चांद्रयान-१, २ आणि ३ मोहिमांच्या माध्यमातून चंद्राच्या दिशेने सातत्याने प्रगती साधली आहे. विशेषतः चांद्रयान-३ ने 2023 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. चांद्रयान-५ मोहिमेच्या माध्यमातून भारत सोपिष्ट तंत्रज्ञान, परदेशी सहकार्य आणि जागतिक सामरिक गणितांमध्ये आपल्या उपस्थितीची ठाम जाणीव करून देत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या हाती ‘ड्रॅगनचा खजिना’; चीनच्या गुप्त लष्करी तंत्रज्ञानावर जगाची नजर, ‘Five Eyes’ आणि फ्रान्सकडूनही मागणी
भारत आणि जपान यांच्यातील ही भागीदारी केवळ तांत्रिक सहकार्यापुरती मर्यादित नसून, ती एक जागतिक संदेशही आहे. आशियातील दोन प्रमुख लोकशाही राष्ट्रे संयुक्तपणे चंद्रावर पाऊल ठेवून विज्ञान, शांती आणि तंत्रज्ञानाचा नवा इतिहास घडवत आहेत. इस्रो आणि JAXA च्या संयुक्त मोहिमेने भविष्यात भारताला अंतराळ विज्ञान, संशोधन आणि सामरिक सुरक्षेच्या क्षेत्रात आणखी उंचीवर नेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्व अधिक ठोस होईल हे निश्चित.