
ittihad ul mujahideen pakistan imp vs ttp difference marathi news
पाकिस्तान (Pakistan News) सध्या एका मोठ्या अंतर्गत सुरक्षेच्या आणि राजकीय संकटातून जात आहे. एकीकडे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) लष्करावर सातत्याने हल्ले करत असतानाच, दुसरीकडे ‘इत्तिहाद-उल-मुजाहिदीन पाकिस्तान’ (IMP) ही नवी दहशतवादी आघाडी पाकिस्तानात आपले पाय घट्ट रोवत आहे. ११ एप्रिल २०२५ रोजी लष्कर-ए-इस्लाम, हाफिज गुल बहादूर गट आणि इन्किलाब-ए-इस्लामी पाकिस्तान यांनी एकत्र येऊन या संघटनेची पायाभरणी केली होती. सुरुवातीला मर्यादित भागात सक्रिय असणारी ही संघटना आता पाकिस्तानच्या संपूर्ण सुरक्षा यंत्रणेसाठी सर्वात डोकेदुखीचा विषय ठरली आहे.
सुरक्षा विश्लेषकांच्या मते, आयएमपी (IMP) ही संघटना स्वतःला टीटीपीपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि अधिक आधुनिक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मार्च ते जून २०२६ दरम्यान या संघटनेने तब्बल १८ हून अधिक आयईडी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले. ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान केवळ प्रशिक्षण व्हिडिओ आणि पोलिसांना धमक्या देण्यापुरती मर्यादित असणारी ही संघटना आता अत्यंत आक्रमक पद्धतीने प्रत्यक्ष हल्ले चढवत आहे. २३ जून २०२६ रोजी ईद-उल-अझहाच्या मुहूर्तावर त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिमध्ये परदेशी लढवय्यांना आपल्यासोबत जोडण्याचे थेट आवाहनही केले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Economy: पुतीन सरकारच्या तिजोरीत खडखडाट! 25 वर्षांत पहिल्यांदाच रशियाने विकले 44 टन सोने, आता हिऱ्यांचा लिलाव
आयएमपीची प्रचार यंत्रणा आणि विचारसरणी अल-कायदाशी (Al-Qaeda) अत्यंत जवळची मानली जाते. अल-कायदा सबकॉन्टिनेंटच्या प्रचार साहित्यातही आयएमपीच्या हल्ल्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. टीटीपी आणि आयएमपी या दोन्ही संघटना पाकिस्तानात सत्ता आणि प्रभाव मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जरी त्यांनी मे २०२६ मधील एका हल्ल्याची संयुक्त जबाबदारी स्वीकारली असली, तरी त्यांच्या कार्यपद्धतीत जमीन-अस्मानाचा फरक दिसून येतो.
Telegram- https://t.co/BATDqYfQJo According to a statement by the Tehreek-e-Taliban Pakistan (TTP), the house of Police APC Incharge Inayat Khan in the Mattani area of Badhbir, Peshawar, was destroyed using explosive material at approximately 2:00 AM last night. Key points from… — InsurgentZone (@InsurgentZone_) July 27, 2026
credit – social media and Twitter
टीटीपी अजूनही पारंपरिक आदिवासी युद्धतंत्र, जुने लढाऊ ढाचे आणि मोठ्या नेटवर्कवर अवलंबून आहे. याउलट, आयएमपी ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी संघटना आहे. आयएमपीचे दहशतवादी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान, स्नायपर रायफल्स, आणि अत्याधुनिक आयईडी (IED) चा वापर करून हल्ले करतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NISAR: इस्रो-नासाच्या ‘निसार’ उपग्रहाचा मोठा खुलासा; व्हेनेझुएला भूकंपात जमीन 2 फूट सरकली, विनाशाचा भयानक चेहरा समोर
आयएमपीच्या व्हिडिओंमध्ये त्यांचे लढवय्ये पारंपरिक कपड्यांऐवजी आधुनिक लष्करी गणवेश (Military Uniforms) आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह दिसतात. तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित तरुणांची नवी पिढी या संघटनेत सामील झाल्यामुळे त्यांनी ही आधुनिक शैली स्वीकारली असल्याचे मानले जाते. संशोधक आणि सुरक्षा तज्ञ अब्दुल सईद यांच्या मतानुसार, इत्तिहाद-उल-मुजाहिदीन हा मुख्यत्वे हाफिज गुल बहादूर यांच्या नेतृत्वाखालील गट आहे. या संघटनेचे वर्चस्व उत्तर वझिरिस्तान, बन्नू आणि खैबर जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. दुसरीकडे टीटीपीचे जाळे संपूर्ण पाकिस्तानभर पसरलेले आहे. असे असले तरी, मर्यादित क्षेत्रातही आयएमपी आपल्या आक्रमक तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रचाराच्या (Digital Propaganda) जोरावर टीटीपीच्या वर्चस्वाला थेट आव्हान देत आहे.