
Pakistan Viral Video
गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये हिंदू शाळांमध्ये संस्कृत शिकवले जाणार असल्याच्या बातम्या समोर आला होत्या. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती. शिवाय हिंदू शाळांमधील संख्या कमी असल्याचा दावा देखील केला जात होता. दरम्यान पाकिस्तानच्या एका हिंदू शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये हा पाकिस्तानच्या हिंदू शाळेतील व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये मूलगा संस्कृत भाषेत श्लोक पठण करत आहे. एक मुलगा शिक्षकांसोमर संस्कृतमध्ये श्लोक म्हणताना दिसत आहे. सुरुवात करताना विद्यार्थी सनातन धर्म की जयने करतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याचा निर्लज्जपणा; महिला पत्रकाराला थेट मारला डोळा, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @harichandparmarofficial या अकाउंटवर शेअर केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी संस्कृतमध्ये श्लोक म्हणणाऱ्या मुलाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत सुपर असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका इतके तर भारतातील हिंदूंनाही येत नसेल असे म्हटले आहे. तर काहींनी जय श्री राम चा जयघोष केला आहे. तर एकाने पाकिस्तानचे आभार हिंदू शालेत संस्कृत शिकवल्याबद्दल आभारा मानले आहेत.
परंतु हा व्हिडिओ नेमका पाकिस्तानमधील आहे का नाही हे अस्पष्ट आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना बैलाने मारली टक्कर ; VIDEO तुफान व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.