Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaish commander: यामागे पण भारताचे गुप्तहेर? पाकिस्तानात जैश कमांडरला संपवले; संशयास्पद अपघाताचा VIDEO झाला VIRAL

Pakistan Jaish Commander Death : पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये एका कार अपघातात मौलाना सलमान अझर यांचा मृत्यू झाला आहे. २७ एप्रिलच्या घटनेनंतर दहशतवाद्यांना हा एक मोठा धक्का आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 30, 2026 | 09:34 AM
jaish commander maulana salman azhar killed car accident pakistan bahawalpur 2026

jaish commander maulana salman azhar killed car accident pakistan bahawalpur 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • जैशचा खात्मा
  • अज्ञातांची दहशत
  • दहशतवाद्यांची सुरक्षित ठिकाणे धोक्यात

Jaish commander Maulana Salman Azhar death : पाकिस्तानच्या (Pakistani Terrorist) बहावलपूरमधून एक अशी बातमी समोर आली आहे, ज्याने केवळ जैश-ए-मोहम्मदलाच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांना हादरवून सोडले आहे. भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझर याचा अत्यंत जवळचा सहकारी आणि जैशचा उच्चस्तरीय कमांडर मौलाना सलमान अझर याचा एका संशयास्पद कार अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा पाकिस्तानात लपून बसलेल्या भारताच्या शत्रूंची एकामागून एक शिकार केली जात आहे.

बहावलपूरमध्ये नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना सलमान अझर हा बहावलपूरमधील एका रस्त्यावरून जात असताना अचानक एका भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कारने त्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अझरचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून वेगाने पसार झाला आणि त्याचा अद्याप कोणताही मागमूस लागलेला नाही. या घटनेला अपघाताचा रंग दिला जात असला तरी, ज्या पद्धतीने अझरला लक्ष्य करण्यात आले, त्यावरून ही एक सुनियोजित ‘हिट अँड रन’ हत्या असल्याचे बोलले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Durand Line: पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून अल-कायदा तालिबानच्या बाजूने; आसिम मुनीर यांच्याविरोधात लष्करालाच ‘असे’ भडकवले

मसूद अझरच्या साम्राज्याला सर्वात मोठा तडाखा

मौलाना सलमान अझर हा केवळ जैशचा कमांडर नव्हता, तर तो संघटनेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असे. मसूद अझरच्या इशाऱ्यावरून भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवण्यात त्याचा थेट सहभाग असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे. बहावलपूरमधील ‘मरकज सुभानअल्लाह’ येथे त्याला दफन करण्याची तयारी सुरू आहे. हे ठिकाण जैशच्या दहशतवाद्यांचा मुख्य गड मानला जातो. अझरच्या जाण्याने जैश-ए-मोहम्मदचा कणा मोडला असून संघटनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

𝑳𝒂𝒅𝒊𝒆𝒔 𝒂𝒏𝒅 𝒈𝒆𝒏𝒕𝒍𝒆𝒎𝒆𝒏, 𝒚𝒐𝒖 𝒂𝒓𝒆 𝒔𝒕𝒊𝒍𝒍 𝒏𝒐𝒕 𝒓𝒆𝒂𝒅𝒚 𝒇𝒐𝒓 𝒕𝒉𝒊𝒔.
THE UNKNOWN GUNMEN BACK IN ACTION.
Top Jaish commander Maulana Salman Azhar has been Eliminated by unknown gunmen.
Funeral scheduled for 4:00 PM (PST) on April 29.
Location: Markaz… pic.twitter.com/jGt1Hc2QB7
— TRISHUL (@TrishulxIN) April 29, 2026

credit – social media and Twitter

२७ एप्रिलची ती ‘टार्गेट किलिंग’ आणि दहशत

सलमान अझरच्या मृत्यूच्या अवघ्या दोन दिवस आधी, म्हणजेच २७ एप्रिल रोजी खैबर पख्तुनख्वामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शेख युसूफ आफ्रिदी याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोरांनी आफ्रिदीवर गोळ्यांचा वर्षाव करून त्याला यमसदनी धाडले होते. लागोपाठ झालेल्या या दोन हत्यांमुळे पाकिस्तानातील ‘सेफ हाऊस’मध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. “अज्ञात हल्लेखोर” कोण आहेत आणि ते इतक्या अचूकतेने कमांडरांना कसे संपवत आहेत, या प्रश्नाने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय (ISI) चक्रावून गेली आहे.

Top Terror commander of Jaish e Mohammad Maulana Salman Azhar has died in suspicious conditions in Bahawalpur. As per claims he was hit by an unknown vehicle. Funeral – 4:00 PM PST 29 April Dhurandhar 🔥 pic.twitter.com/uhc4hwQTF1 — Indo Frontline🇮🇳 (@Kakashii2O12406) April 29, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DIVEX 2026: समुद्रात भारताचे ‘ऑपरेशन समुद्रमंथन’! चीनच्या नाकेबंदीसाठी श्रीलंका आणि भारतीय नौदल सज्ज; खोल समुद्रात दाखवला पराक्रम

दहशतवाद्यांमध्ये ‘अघोषित’ आणीबाणी

या घटनांनंतर पाकिस्तानातील लष्कर, जैश आणि हिजबुलच्या इतर म्होरक्यांनी आपले तळ बदलण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणांना ते आतापर्यंत सुरक्षित मानत होते, तिथेच त्यांचे मृत्यू होत असल्याने दहशतवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे. पाकिस्तानी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे भासवत असले, तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या वारंवार होणाऱ्या हत्यांमुळे “भारताचे शत्रू आता कुठेच सुरक्षित नाहीत,” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मौलाना सलमान अझर कोण होता?

    Ans: मौलाना सलमान अझर हा जैश-ए-मोहम्मदचा उच्चस्तरीय कमांडर आणि मसूद अझरचा अत्यंत विश्वासू सहकारी होता.

  • Que: त्याचा मृत्यू नेमका कसा झाला?

    Ans: पाकिस्तानातील बहावलपूर येथे एका अज्ञात कारने त्याला जोरदार धडक दिली, ज्याला 'संशयास्पद अपघात' मानले जात आहे.

  • Que: गेल्या ४८ तासांत पाकिस्तानात किती दहशतवादी मारले गेले?

    Ans: गेल्या ४८ तासांत दोन मोठे दहशतवादी मारले गेले आहेत - २७ एप्रिलला लष्करचा शेख युसूफ आफ्रिदी आणि त्यानंतर जैशचा सलमान अझर.

Web Title: Jaish commander maulana salman azhar killed car accident pakistan bahawalpur 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • Pakistan News
  • Pakistani Terrorist
  • terrorist killed

संबंधित बातम्या

Durand Line: पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून अल-कायदा तालिबानच्या बाजूने; आसिम मुनीर यांच्याविरोधात लष्करालाच ‘असे’ भडकवले
1

Durand Line: पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून अल-कायदा तालिबानच्या बाजूने; आसिम मुनीर यांच्याविरोधात लष्करालाच ‘असे’ भडकवले

Pakistan Crisis : पाकिस्तान रडकुंडीला! ‘भारताच्या केवळ एका सहीने…’ ; शाहबाज यांच्या मंत्र्यानेच दिला सरकारला घरचा आहेर
2

Pakistan Crisis : पाकिस्तान रडकुंडीला! ‘भारताच्या केवळ एका सहीने…’ ; शाहबाज यांच्या मंत्र्यानेच दिला सरकारला घरचा आहेर

Pak Afghan War : पाक-अफगाण संघर्ष पुन्हा भडकला; क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ नागरिकांचा बळी, शांततेचे प्रयत्न फेल?
3

Pak Afghan War : पाक-अफगाण संघर्ष पुन्हा भडकला; क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ नागरिकांचा बळी, शांततेचे प्रयत्न फेल?

Trump Iran Talks : पाकिस्तान तोंडावर आपटला! आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार; इराणनेही फिरवली पाठ
4

Trump Iran Talks : पाकिस्तान तोंडावर आपटला! आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार; इराणनेही फिरवली पाठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.