Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japan Earthquake: जपान हादरला! क्युषू भागात 7.1 तीव्रतेचा भूकंप, किनारी भागांसाठी सतर्कतेचा इशारा

जपानच्या क्युषू बेटावरील कुमामोटो प्रांतात 7.1 रिश्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर जपान हवामान विभागाने किनारी भागांसाठी सुमारे 1 मीटर उंचीच्या लाटांचा सुनामी इशारा (Tsunami Advisory) जारी केला आहे. नागरिकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 28, 2026 | 02:48 PM
जपान हादरला! क्युषू भागात 7.1 तीव्रतेचा भूकंप, किनारी भागांसाठी सतर्कतेचा इशारा

जपान हादरला! क्युषू भागात 7.1 तीव्रतेचा भूकंप, किनारी भागांसाठी सतर्कतेचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • क्युषू भागात 7.1 तीव्रतेचा भूकंप, किनारी भागांसाठी सतर्कतेचा इशारा
  • सात भागांसाठी सतर्कतेचा इशारा
  • अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित
Kumamoto Earthquake: जपानच्या दक्षिणेकडील क्युषू (Kyushu) बेटावर मंगळवारी 7.1 रिश्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपानंतर जपान हवामान विभागाने (JMA) सुनामीचा इशारा जारी करत नागरिकांना समुद्रकिनारे आणि सागरी भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. समुद्रात सुमारे 1 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जपान हवामान विभागानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू कुमामोटो परिसरात जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. जपानच्या शिंदो (Shindo) भूकंप मापन प्रणालीवर या भूकंपाची तीव्रता शिंदो 7 इतकी नोंदवण्यात आली असून, हा अत्यंत तीव्र धक्का मानला जात आहे.

सात भागांसाठी सतर्कतेचा इशारा

भूकंपानंतर कुमामोटोच्या पश्चिम किनाऱ्यावरील आरिआके उपसागर (Ariake Bay) परिसरासाठी सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. याशिवाय किमान सात भागांमध्ये भूकंपाच्या धोक्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Tejas mk1a ge f404 Engine: वायुसेनेसाठी आनंदाची बातमी! तेजस MK-1A साठी GE कडून इंजिन पुरवठ्याला वेग

यात्सुहिरो, उतो, माशिकी आणि मिसातो येथे शिंदो स्केलवर 6 तीव्रतेचे धक्के जाणवले. तर नागासाकी, कागोशिमा, फुकुओका, सागा आणि मियाझाकी या भागांत 5 किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले.

45 हजारांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित

भूकंपामुळे कुमामोटो प्रांतातील सुमारे 45,600 घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आपत्कालीन पथके विविध भागांत तैनात करण्यात आली आहेत.

अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित

भूकंपानंतर परिसरातील अणुऊर्जा प्रकल्पांची तपासणी करण्यात आली असून, सध्या कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पात बिघाड किंवा गळती झाल्याचे आढळलेले नाही. संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले आहे.

टोकियोपासून सुमारे 900 किमी अंतरावर

कुमामोटो हा परिसर राजधानी टोकियोपासून सुमारे 900 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे राजधानीत मोठे नुकसान झाले नसले तरी दक्षिण जपानमध्ये प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.

2016 च्या भूकंपाची आठवण

याच कुमामोटो भागात 2016 मध्येही भीषण भूकंप झाला होता. त्या दुर्घटनेत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू, 1,800 पेक्षा जास्त जण जखमी, तर हजारो घरे उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे यावेळीही प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सुनामीच्या इशाऱ्यामुळे किनारी भागातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Bank of Barodaमध्ये डेटा सुरक्षेचा प्रश्न; माहिती बाहेर गेल्याच्या चर्चेनंतर तपासाला वेग

Web Title: Japan 7 1 earthquake tsunami advisory issued kyushu kumamoto

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Earthquake
  • Japan

संबंधित बातम्या

NISAR: इस्रो-नासाच्या ‘निसार’ उपग्रहाचा मोठा खुलासा; व्हेनेझुएला भूकंपात जमीन 2 फूट सरकली, विनाशाचा भयानक चेहरा समोर
1

NISAR: इस्रो-नासाच्या ‘निसार’ उपग्रहाचा मोठा खुलासा; व्हेनेझुएला भूकंपात जमीन 2 फूट सरकली, विनाशाचा भयानक चेहरा समोर

Maharashtra News: 24 तासांत महाराष्ट्र हादरला! 3 जिल्ह्यांना भूकंपाचा तडाखा; नेमकं काय घडतंय?
2

Maharashtra News: 24 तासांत महाराष्ट्र हादरला! 3 जिल्ह्यांना भूकंपाचा तडाखा; नेमकं काय घडतंय?

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही
3

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.