
Jeffery Epstein Files
किती पैशांमध्ये खेळत होता Jeffrey Epstein? जाणून घ्या त्याची संपत्तीचा ‘हा’ आकडा
ओव्हरसाईट या कमिटीने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानुसार, महिलांचा आणि अल्पवयीन मुलींचा व्यवहार एखाद्या लिलावाप्रमाणे केला जायचा, तर काहींचे दर ठरलेले असायचे. व्हाइट हाउस ओव्हरसाइचने कमिटीच्या पोस्टनुसार, या फोटोंमध्ये टेक्सट मेसेज, मुली आणि महिलांशी संबंधित काही मजकूर, त्यांची ओखळपत्रे आणि काही फोटोज असायचे. टेक्स्टवर ‘आता मुली पाठवत आहे’ असा मेसेज केला जायचा. या पोस्टमध्ये एका रशियन महिला, अल्पवयी मुलींच्या बाबतील काही मेसेज उघड झाले आहे. ज्यामध्ये एका रशियन तरुणीची किंमत ही १००० डॉलर ठरलेली आहे.
यामध्ये मुलींचे फोटोज, त्यांचे विविध देशांचे पासपोर्टस बाबतही काही माहिती उघड करण्यात आली आहे. यामध्ये रशिया, युक्रेन, इटली,. चेक प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका, लिथुआनियांसारख्या देशांचा समावेश आहे. काही देशांची नावे गुपित ठेवम्यात आली आहे. मात्र यावरुन या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावरची व्याप्ती स्पष्ट होते.
NEW: Oversight Dems are releasing additional photos from Jeffrey Epstein’s estate to the public. We will continue releasing photographs and documents to provide transparency for the American people. It’s time for the Department of Justice to release the files. pic.twitter.com/ZGAvxVLCUq — Oversight Dems (@OversightDems) December 18, 2025
काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचे जेफ्री एपस्टीन आणि काही मुलींसोबत फोटो समोर आले होते. शिवाय काही फोटोमध्ये महिलांच्या शरीरावर लोलिगा या वादग्रस्त कादंबरीतील काही ओळी लिहिलेल्या दिसत आहेत, यामुळे अल्पवयीन मुलींकडे विकृत नजरेने पाहणाऱ्या लोकांची मानसिकता दिसून येते.
सध्या या प्रकरणातील सर्व गोष्टी उघड करण्यात आलेल्या नसल्याने मुलींचा दर कसा ठरवला जायचा? शिवाय जेफ्री एपस्टीनचे हे जाळे नक्की किती मोठे होते? जेफ्रीला या व्यवहारांसाठी कोणाची मदत मिळायची? जेफ्रीचे क्लायंट्स कोण होते? मुलींना कसे आणले जायचे हे सर्व प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.
Ans: जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील कुख्यात अब्जावधीश आणि लैंगिक गुन्हेगार होता. त्याच्यावर अल्पवयीन मुली आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा आणि मानवी तस्करीचा आरोप होता. त्याच्याशी संबंधित सरकारी कादहपत्रे, फोटो, आणि पुरावे उघड करण्यात आली आहेत.
Ans: जेफ्री एपस्टीन प्रकरणात महिला आणि अल्पवयीन मुलींचा लिलाव केला जायचा. अनेकदा जेफ्री क्लायंट्सला टेक्सवर सर्व माहिती आणि फोटोज पाठवयाचा. ज्यामध्ये मुलींंची ठरलेली किंमतही असायची.
Ans: जेफ्री एपस्टीन प्रकरणात सध्या रशिया, युक्रेन, मोरोक्को, इटली, चेक प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका, लिळुआनिया या देशांतील मुलीं आणि महिलांतचे पुरावे आढळले आहेत.
Ans: एपस्टीन प्रकरणासंबंधित फाइल्स अमेरिकेच्या न्याय विभागाने १९ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक केल्या आहेत.