किती पैशांमध्ये खेळत होता Jeffrey Epstein? जाणून घ्या त्याची संपत्तीचा 'हा' आकडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेफ्रीकडे ५०० ते ६०० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती
मिळालेल्या माहितीनुसार, जेफ्रीच्या मृत्यूवेळी २०१९ मध्ये त्याची संपत्ती ही अंदाजे ५६० ते ६०० दशलक्ष डॉलर्स नेटवर्थ एवढी होती. जेफ्रीला अब्जाधीश म्हणून ओळखले जात असे, परंतु तो अब्जाधीश नव्हता. जेफ्री अत्यंत श्रीमंत होता पण त्याची संपत्ती ऑफशओअर ट्रस्ट, गुप्त गुंतवणूक अशा आर्थिक रचनांमध्ये लपवलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेफ्रीच्या संपत्तीचा मोठा भाग हा रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेला आहे.
अमेरिकेती अब्जाधीश म्हणून जेफ्री एपस्टीनची ओळख
न्यूयॉर्कच्या अप्पर इस्ट साइटवर ५० दशलक्ष पेक्षा अधिक किमतीचे अलिशान हवेली जेफ्रीकडे होती. तसेच फ्लोरिडा येथील पाम बीचवरही १२ दशलक्ष किमतीचे अलिशान मेंशन, तर न्यू मेक्सिकोमध्ये अंदाजे १७ दशलक्ष किमतीचे रॅंच जेफ्री एपस्टीनच्या मालकीचे होते. या सर्व प्रायव्हेट मालमत्तांमुळे त्याला अमेरिकेत अब्जाधीश म्हणून ओळखले जायचे.
दोन प्रायव्हेट आयलंड
या मालमत्तेशिवाय एपस्टिनकडे यूनायडेट स्टेट्सच्या व्हर्जिन आयलंडमध्ये दोन प्रायव्हेट आयलंड होते. लिंटिल सेंट जेम्स आणि ग्रेस सेंट जेम्स असे या आयलंड्सना नावे देण्यात आली होती. अमेरिकेच्या ओव्हसाइट क्रॉंग्रसने या बेटांवरच एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यांसंबंधीचे प्रकार घडले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान २०२३ मध्ये ही दोन्ही बेटे ६० लाख दशलक्ष डॉलर्सला कायदेशीरपणे विकण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडीतांशी सेटलमेंटससाठी आणि माहिती गुपित ठेवण्यासाठी ही रक्कम वापरली गेली. एपस्टीनच्या फाईल्सनुसार, त्याच्याकडे ३८० दशलक्ष रोख रक्कम आणि गुंतवणूकीचा साठा होता. सध्या जेफ्रीकडे एवढी संपत्ती कुठून आली, त्याचा कोणताही व्यवसाय नसताना त्याने एवढी गुंतवणूक कशी केली हे प्रश्न आजही गूढ आहेत. अनेकदा याचा संबंध लेक्सी वेक्सनर आणि लिओन ब्लॅक यांसारख्या उद्योजकांशी जोडला जातो.
Jeffrey Epstein Files : एपस्टाईन फाइल्समुळे पुन्हा खळबळ ; सेलिब्रिटींच्या संबंधाची नवी यादी समोर
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, जेफ्री एपस्टीनकडे २०१९ मध्ये मृत्यूवेळी ५६० ते ६०० दशलक्ष डॉलर्स नेटवर्थ होते.
Ans: एपस्टीनने त्याची संपत्ती न्यूयॉर्क, न्यू मेक्सिको, फ्लोरिडा, व्हर्जिन आयलंड्समध्ये गुंतवली होती.
Ans: जेफ्री अत्यंत श्रीमंत होता पण त्याची संपत्ती ऑफशओअर ट्रस्ट, गुप्त गुंतवणूक अशा आर्थिक रचनांमध्ये लपवलेली होती.






