कार्यकाळ समाप्तीपूर्वी बायडेन यांनी 37 गुन्हेगारांची फाशीची शिक्षा केली माफ म्हणाले...
वॉश्गिंटन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या कार्यकाळाच्या संपण्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बायडेन यांनी 40 पैकी 37 गुन्हेगारांच्या मृत्युदंडाची शिक्षेला माफ करून ती आजीवन कारावासात बदलली आहे. मात्र, 3 उच्च प्रोफाईलच्या गुन्हेगारांच्या मृत्यूदंडाचा शिक्षा कायम ठेवली आहे. हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्काळ सुरु होण्यापूर्वी कादी आठवडे आदीच घेण्यात आला आहे.
37 गुन्हेगारांना नवजीवन, 3 ची मृत्युदंड कायम
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात मृत्युदंड माफ करण्याचे प्रमाण खूप कमी होते, त्यामुळे बायडन यांच्या निर्णयावर विशेष लक्ष केंद्रित झाले आहे. बायडेन यांच्या या निर्णयाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.जो बायडेन यांच्या या निर्णयामुळे मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या 40 गुन्हेगारांपैकी 37 जणांना जीवनाची नवीन संधी मिळाली आहे. यापैकी 9 जणांना तुरुंगातील सहकारी कैद्यांची हत्या केल्याबद्दल शिक्षा झाली होती, 4 जण बँक दरोड्यातील हत्या प्रकरणात दोषी ठरले होते, तर 1 जणाने तुरुंग रक्षकाची हत्या केली होती. मात्र, 3 गुन्हेगारांवर अद्याप मृत्युदंडाची शिक्षा कायम आहे.
माफ न कलेले गुन्हे गार
या गुन्हेगारांमध्ये 2013 च्या बोस्टन मॅराथॉन बॉम्बस्फोटाचा सहभागी जोखर त्सरनेव, 2015 मध्ये दक्षिण कॅरोलिनातील चार्ल्सटन चर्चमध्ये 9 कृष्णवर्णीयांची हत्या करणारा श्वेत वर्चस्ववादी डायलन रूफ, आणि 2018 मध्ये पिट्सबर्गमधील ट्री ऑफ लाइफ सिनेगॉग येथे 11 ज्यू उपासकांची हत्या करणारा रॉबर्ट बॉवर्स यांचा समावेश आहे. हे गुन्हे घृणा आणि दहशतवादाशी संबंधित असल्याने त्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला कायम ठेवण्यात आले आहे.
बायडन यांचे विचार
या निर्णयानंतर जो बायडेन यांनी निवेदन जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “मी या हत्यार्यांच्या घृणास्पद कृतींची कठोर शब्दांत निंदा करतो. पीडित कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, आणि त्यांच्या अकल्पनीय नुकसानाबद्दल माझ्या संवेदना आहेत. परंतु, माझ्या अंतरात्म्याने आणि अनुभवाने मला सांगितले आहे की, मृत्युदंडाचा वापर संघीय पातळीवर बंद केला पाहिजे.”
बायडेन यांच्या या निर्णयामुळे मृत्युदंडावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या या निर्णयाचे काहींनी कौतुक केले आहे, तर काहींनी त्यावर तीव्र टीका केली आहे. मात्र, बायडेन यांनी आपल्या या निर्णयाद्वारे मृत्युदंडाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
स्वत:च्या मुलाला देखील केले माफ
जो बायडेन यांनी आपल्या मुलाची शिक्षा देखील माफ केली आहे. बायडेन यांनी यापूर्वी सांगितले होते की दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर ते आपल्या मुलाची शिक्षा माफ करणार नाहीत किंवा कमी करणार नाहीत. आता, अध्यक्षीय निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परत येण्याच्या दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, बायडेन यांनी हे पाऊल उचलले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचा मुलगा हंटरला माफ केले, त्याला संभाव्य तुरुंगवासाच्या शिक्षेपासून वाचवले. या निर्णयासह, बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या अधिकारांचा वापर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या फायद्यासाठी न करण्याचे त्यांचे पूर्वीचे वचन उलटवले.