Karachi Earthquakes Dozens of prisoners escape from Malir Jail in Karachi, after Earthquake
इस्लामाबाद: एक मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी (२ जून) पाकिस्तानच्या कराचीमधील मालीर तुरुंगातून २१६ कैदी फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कराचीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.त्यानंतर खबरदारी म्हणून कैद्यांना बॅंरेकमधून बाहेर काढण्यात आले. परंतु कैद्यांनी या संधीचा फायदा घेतला आणि मुख्य गेट तोडून फरारा झाले. केवळ ८० कैद्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे, तर बाकीचे १३५ कैदी फरार होण्यात यशस्वी झाले आहे.
या घटनने मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी तुरुंग अधीक्षख अर्शद शाह यांनी या घटनेची पुष्टी केलीच. मीडिया रिपोर्टनुसार, कैदी भिंत तोडून फरार झाल्याचे म्हटले, परंतु पाकिस्तानच्या सरकारने स्पष्ट केले आहे की, कोणतीही भिंत तुटलेली नाही, चेंगराचेंगरीच्या वेळी सर्व कैदी मुख्य गेटमधून पळून गेले आहेत.
भूकंपानंतर खबरदारी म्हणून कैद्यांना बॅंकेरमधून बाहेर काढण्यात आल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री लांजर यांनी म्हटले. यामध्ये जवळपास हजार कैदी होती. या गोंधळात काही कैद्यांनी धक्काबुक्की सुरु केली आणि यामुळे कैदी मुख्य गेटकडे पळाले आणि संधी मिळताच फरार झाले. तरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, फरार झालेल्या कैद्यांचा शोध सुरु केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी २० हून अधिक फरार कैद्यांना पुन्हा ताब्यात घेतले आहे. तुरुंगाबाहेर रेंजर्स तैनात करण्यात आले आहे. तसेच इतर कैद्यांचा शोध सुरुच आहे.
कैद्यांना बाहेर काढताना धक्काबुक्कीमुळे चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका कैद्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ४ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहे. या घटनेनंतर रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्सने तुरुंगाचा ताबा घेतला. आयजी आणि डिआयजी आणि जेलमंत्री घटनास्थळी पोहोचले आहेत. संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. सध्या तुरुंगातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्सना देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी जुलैमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) रावळकोट तुरुंगातून १९ कैदी फरार झाले होते. यातील ६ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
कराचीमध्ये गेल्या २४ तासांता हा दहावा भूंकप आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री ११.१६ वाजता लांधी शेरपाओ आणि कायदाबाद या भागांमध्ये २.४ तीव्रतेच्या भूंकपाचा झटका जाणवला. या भागांमध्ये भूकंपाचे झटके सामान्य आहेत.