Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळच्या Medical Studentची उझबेकिस्तानमध्ये निर्घृण हत्या; वर्गमित्राकडून सक्तीच्या धर्मांतराचा छळ अन् लॅपटॉपने प्रहार

Indian Medical Student Murder In Uzbekistan : केरळमधील अलाप्पुझा येथील २२ वर्षीय सावरिया बसंत हिची उझबेकिस्तानमधील बुखारा मेडिकल कॉलेजमध्ये तिचा वर्गमित्र सद्रुल अनम याने डोक्यात लॅपटॉप मारून हत्या केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 10, 2026 | 12:51 PM
kerala medical student savariya basanth murdered in uzbekistan by classmate forced conversion suspected

kerala medical student savariya basanth murdered in uzbekistan by classmate forced conversion suspected

Follow Us
Follow Us:
  • धक्कादायक घटना
  • सक्तीच्या धर्मांतराचा संशय
  • भारतात कायदेशीर कारवाई सुरू

Kerala medical student murdered Uzbekistan : उच्च शिक्षणाचे आणि डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून परदेशात गेलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीचा (Kerala) तिच्याच वर्गमित्राने क्रूरपणे अंत केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. उझबेकिस्तानमधील बुखारा स्टेट मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये (Bukhara State Medical Institute) एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या केरळच्या २२ वर्षीय सावरिया बसंत हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी तिचा वर्गमित्र सद्रुल अनम (२२) याला उझबेक पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाला आता सक्तीच्या धर्मांतराचा (Forced Religious Conversion) धक्कादायक अँगल मिळाला असून खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण घटना?

केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील हरिपाद येथील रहिवासी असलेली सावरिया बसंत आणि मलप्पुरम जिल्ह्यातील रहिवासी असलेला सद्रुल अनम हे दोघेही बुखारा मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते आणि एकाच हॉस्टेलमध्ये राहत होते. कॉलेज कॅम्पसमध्ये दोघांमध्ये एका विषयावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या सद्रुलने त्याच्या हातातील जड लॅपटॉपने सावरियाच्या डोक्यावर एकापाठोपाठ एक अनेक प्रहार केले. या जीवघेण्या हल्ल्यात सावरिया गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Typhoon Bavi update : चीन आणि तैवानवर गंभीर संकट! ताशी 162 किमी वेगाने पुढे सरकत आहे बावी चक्रीवादळ, 50 जणांचा मृत्यू

केवळ वाद की पूर्वनियोजित छळ? सक्तीच्या धर्मांतराचा संशय

उझबेक पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांच्या साक्षीवरून एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी सद्रुल अनम हा गेल्या अनेक दिवसांपासून सावरियावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रचंड दबाव टाकत होता. तिने धर्मांतरास स्पष्ट नकार दिल्याने तो तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता, अशी साक्ष प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

सावरियाचा मृतदेह भारतात आणल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. सावरियाच्या शरीरावर डोक्यापासून पायापर्यंत अनेक गंभीर जखमा आणि छळाच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे तिचा मृत्यू केवळ लॅपटॉपच्या एका आघातामुळे झाला नसून, हत्येपूर्वी तिला अत्यंत क्रूरपणे यातना देण्यात आल्या होत्या, असा दावा तिच्या पालकांनी केला आहे.

केरळ पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

सावरियाचा मृतदेह बुधवारी केरळमध्ये आणण्यात आला, त्यानंतर अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये तिचे पुन्हा एकदा शवविच्छेदन (Re-postmortem) करण्यात आले. सावरियाच्या पालकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दिलेल्या लेखी तक्रारीवरून केरळच्या हरिपाद पोलिसांनी हत्येचा ‘झिरो एफआयआर’ नोंदवला आहे. घटना परदेशात घडली असली तरी भारतीय कायद्यानुसार (BNS Sec 103) गुन्हा नोंदवण्याची विशेष तरतूद असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ebola Crisis Congo : काँगोत इबोलाचा उद्रेक! 1,700 हून अधिक बाधित, 625 जणांचा मृत्यू; युगांडातही पसरला प्रादुर्भाव

परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाची मदत

वरिष्ठ पोलीस अधिकारी बिनू कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दूतावास (Indian Embassy) आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) माध्यमातून उझबेकिस्तानमधील कायदेशीर तपासाची कागदपत्रे मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आरोपी सद्रुल उझबेकिस्तानमधील तुरुंगात आहे. जर उझबेक न्यायालयाने त्याला तेथेच कडक शिक्षा सुनावली, तर तांत्रिकदृष्ट्या केरळमधील केस बंद केली जाईल. मात्र, पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यास कायदेशीर अडथळे आल्यास, भारत सरकार आरोपीच्या भारतामध्ये प्रत्यार्पणाची (Extradition) प्रक्रिया सुरू करेल, जेणेकरून त्याला भारतीय कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल.

Web Title: Kerala medical student savariya basanth murdered in uzbekistan by classmate forced conversion suspected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Kerala
  • medical student
  • Muslim Country
  • World news

संबंधित बातम्या

26 लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् 750 किलो ड्रग्ज; ‘मिशन इम्पॉसिबल’ शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा
1

26 लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् 750 किलो ड्रग्ज; ‘मिशन इम्पॉसिबल’ शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा

Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले
2

Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश
3

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
4

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.