Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Funeral : वडिलांच्या अंत्ययात्रेलाही उपस्थित राहणार नाहीत मोजतबा खामेनेई? समोर आले मोठे कारण

Khamenei Funeral Update : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला ४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान त्यांचे पुत्र आणि इराणचे सध्याचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या उपस्थितीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 11:39 AM
खामेनेईंच्या हत्येचा बदला

खामेनेईंच्या हत्येचा बदला

Follow Us
Follow Us:
  • वडिलांच्या अंत्ययात्रेलाही उपस्थित राहणार नाहीत मोजतबा खामेनेई
  • समोर आले मोठे कारण?
  • जाणून घ्या
Khamenei Funeral News in Marathi : तेहरान : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या शासकीय अत्यंसंस्कार आणि दफनविधीला ४ जुलै पासून सुरुवात होणार आहे. तर ०९ जुलै रोजी अंतिम दफनविधी केला जाईल. दरम्यान त्यांच्या अंतिमयात्रेत उपस्थित राहण्याबाबत त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोजतबा आपल्या वडिलांच्या अंतिमयात्रेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. सुरक्षा धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

काय आहे कारण?

भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी अयातुल्ला हकीम इलाही यांनी याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मोजतबा खामेनेई यांची अंत्ययात्रेत उपस्थितीची शक्यता कमी आहे. इस्लामिक पंरपरेनुसार त्यांना अंत्यप्रार्थचे नेतृत्व करण्याची इच्छा होती. परंतु मध्यपूर्वेतील संघर्ष आणि इस्रायली हलल्यांमुळे संभाव्य धोका लक्षात घेता त्यांना सार्वजिनिक कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.

कधी होणार अंतिम दफनविधी?

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराठी इराणमध्ये तयारी सुरु करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलच्या लष्करी कारवाईत त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या सुमारे १३१ दिवसानंतर म्हणजे ४ महिने आणि ९ दिवसांनी अंतिम यात्रा सुरु होत आहे.

०४ जुलै रोजी अंतिम यात्रेला सुरुवात होईल. यानंतर ९ जुलै २०२६ रोजी इस्लामिक परंपरनेनुसार  अंतिम दफनविधी केला जाईल. तेहरान, कूम, इराकमधील काही धार्मिक स्थळे आणि अखेरीस मशहद येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. इराणी सरकारने नागरिकांना मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

देशभरात कडक सुरक्षाव्यवस्था

खामेनेईंच्या अंत्ययात्रेच्या पार्श्वभूमीवर इराणने देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. देशातील अनेक संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. काही भागांमध्ये हवाई क्षेत्रांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहे. संभाव्य हल्ल्यांचा धोका लक्षात घेता सरकार सतर्क आहे.

इराणचा अमेरिकेला कडक इशारा

याच वेळी इराणने अमेरिका आणि इस्रायलला कडक इशारा दिला आहे. या काळात कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई टाळण्याचे म्हटले आहे. अत्यंविधीदरम्यान कोणताही हल्ला किंवा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

न्यूयॉर्कमध्ये धक्कादायक घटना! संयुक्त राष्ट्र मुख्यालयाबाहेर तिबेटी व्यक्तीचे आत्मदहन; थरारक VIDEO समोर

Web Title: Khamenei funeral mojtaba khamenei likely to skip fathers funeral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran News
  • Mojtaba Khamenei
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : युक्रेन युद्धात रशियाला सर्वात मोठा धक्का; 14.7 लाखांहून अधिक सैनिकांसह लष्करी साधनसामग्रीचा महाविनाश
1

Russia Ukraine War : युक्रेन युद्धात रशियाला सर्वात मोठा धक्का; 14.7 लाखांहून अधिक सैनिकांसह लष्करी साधनसामग्रीचा महाविनाश

Israel Syria Airstrikes: इस्रायलचे सीरियाच्या ‘Abu al Duhur’ हवाई तळावर 8 भीषण हल्ले; अमेरिकेचा थेट आक्षेप
2

Israel Syria Airstrikes: इस्रायलचे सीरियाच्या ‘Abu al Duhur’ हवाई तळावर 8 भीषण हल्ले; अमेरिकेचा थेट आक्षेप

Kuril Islands : ‘हे जपानला अजिबात मान्य नाही!’ पंतप्रधान सनाए ताकाइची पुतिन यांच्या भेटीवर भडकल्या; रशियाचाही जोरदार पलटवार
3

Kuril Islands : ‘हे जपानला अजिबात मान्य नाही!’ पंतप्रधान सनाए ताकाइची पुतिन यांच्या भेटीवर भडकल्या; रशियाचाही जोरदार पलटवार

Iran Mocked Trump: ‘7000 मैल दूर बसून स्वप्ने पाहू नका’; होर्मुझ सामुद्रधुनीवरील ट्रम्प यांच्या दाव्याची इराणकडून उघडपणे खिल्ली
4

Iran Mocked Trump: ‘7000 मैल दूर बसून स्वप्ने पाहू नका’; होर्मुझ सामुद्रधुनीवरील ट्रम्प यांच्या दाव्याची इराणकडून उघडपणे खिल्ली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.