
Iran denied reports of an oil leak near Kharg Island
ऑर्बिटल ईओएल नावाच्या एका संस्थेने सॅटेलाइट फोटांचा हवाला देत खार्ग बेटाजवळ तेला एक मोठा तवंग दिसून आल्याचे म्हटले आहे. संस्थेच्या अहवालानुसार, सुमारे ३ हजार बॅरलहून अधिक कच्च तेले समुद्रात सांडले आहे. हे तेल २० चौरस मैल परिसरात पसरले असून सौदी अरेबियाच्या दिशेने सरकत असल्याची भिती अहवालात करण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र, इराणच्या ऑईल टर्मिनल्स कंपनीने या अहवालाला फेटाळला आहे. कंपनीने तातडीने तपासणीचे आदेश दिले होते. यावळी तपासणीत कोणत्याही प्रकारची तेल गळती आढळली नाही. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तज्ज्ञांच्या पथकाने संपूर्ण बेटाचे सखोल निरीक्षण केले असून बेटावरील सर्व स्टोरेज टँक, समुद्राखालील पाइपलाइन्स, तेल लोडिंग फॅसिलीट आणि टँकर्सची तपासणी करण्यात आली आहे.
या तपासणीदरम्यान आणि लॅब टेस्टिंगनंतर समुद्रात तेलाचा कोणताही अंश नसल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण संस्था मरीन इमर्जन्सी म्युच्युअल एड सेंटर(MEMAC) ने देखील तेल गळतीचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Iran’s Oil Terminals Company has denied reports of an oil leak near Kharg Island, state media reported, after satellite imagery last week appeared to show a large slick west of the country’s main oil export hub in the Gulf. 🔴 LIVE updates: https://t.co/wYkfVxluv5 pic.twitter.com/2e0Sw8L7R9 — Al Jazeera English (@AJEnglish) May 10, 2026
खार्ग बेट इराणसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. इराणच्या एकूण कच्चा तेलाच्या निर्यातीपैकी ८० ते ९०% व्यापार याच बेटावरुन होतो. या बेटावर सुमारे ७० लाख बॅरल तेल जहाजांमध्ये भरण्याची अवाढव्य क्षमकता आहे. यामुळे येथे होणारा कोणताही तांत्रिक बिघाड किंवा गळती केवळ पर्यावरणासाठीत नाही, तर इराणच्या जागतिक तेल व्यापारासाठी देखील धोकादायक आहे. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.
Ans: ऑर्बिटल ईओएल नावाच्या एका संस्थेने सॅटेलाइट फोटांचा हवाला देत खार्ग बेटाजवळ तेला एक मोठा तवंग दिसून आल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार, सुमारे ३ हजार बॅरलहून अधिक कच्च तेले समुद्रात सांडले आहे. हे तेल २० चौरस मैल परिसरात पसरले आहे.
Ans: इराणने या अहवालाची दखल घेत तातडीने तपास केला. यानंतर हा दावा निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तज्ज्ञांना निरीक्षणा आणि लॅब टेस्टिंगमध्ये समुद्रात कोणत्याही प्रकारची तेल गळती आढळलेली नाही असे इराणने स्पष्ट केले.
Ans: खार्ग बेटावरुन इराणच्या एकूण कच्चा तेल निर्यातीपैकी ८० ते ९०% निर्यात खार्ग बेटावरुन होते. हे बेट इराणच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. या बेटावर कोणत्याही प्रकारचा धोका इराणच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करु शकतो.