
kim jong un breaks down in tears while honoring fallen soldiers who fought in russia ukriane war
किम जोंग उन यांना रडताना पाहायला मिळाले आहे. असे दृश्य फार क्वचित दिसते. यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झाले आहेत. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. गेल्या चार वर्षापासून हे युद्ध सुरु आहे. या युद्धात उत्तर कोरियाने रशियाला १५, हजार सैनिकांची मदत पाठवली होती. यामध्ये उत्तर कोरियाचे सैनिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नुकतेच उत्तर कोरियाने त्यांच्या सैनिकांचे पार्थिव रशियातून विमानाने देशात आणले.
डोनाल्ड ट्रम्पला झोंबणार मिर्ची? पुतिनसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर
यावेळी उत्तर कोरियाने रशिया युक्रेन युद्धात (Russia Ukriane War) मरण पावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहली. राजधानी प्योंगयांगमध्ये यासाठी खास कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळ उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उनही उपस्थित होते. यावेळी त्यांचे वेगळे रुप पाहायला मिळाले.
यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी किम जोंग उन येथे उपस्थित होते. यावेळी त्यांना रडू कोसळले. त्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले. त्यांनी इतर सैनिकांचीही गळा भेट घेतली. तसेच मृत पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबाचीही भेट घेतली. यावेळी किम जोंग उन त्यांच्या कुटुंबातील मुलांशी देखील भावुक होऊन त्यांना मिठी मारताना दिसले. त्यांचे एक वेगळे रुप लोकांना पाहायला मिळाले.
In North Korea, they staged the return of coffins with soldiers killed in the Kursk region. Kim Jong Un crying in Pyongyang, generals sobbing beside him. What a performance. pic.twitter.com/aFbsZrRl4n — Maria Drutska 🇺🇦 (@maria_drutska) August 23, 2025
किम जोंग उन यांनी एका चिमुकलीला मिठी मारली, तिच्या डोक्याचे चुंबनही घेतली. तसेच यानंतर त्यांनी सैनिकांनाही सॅल्युट मारला. हे सर्व दृश्य अगदी भावुक करणारे होते. हे पाहून किम जोंग उन निर्दयी आहे, हेही अगदी तुम्हाला खोटे वाटेल. सध्या हा सर्व प्रसंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आाहे.
Kim Jong Un sheds crocodile tears with the widows, children, and surviving comrades of North Korean soldiers expended in occupied Ukraine. https://t.co/lyjz7218qb pic.twitter.com/XqNochbQDe — Roy🇨🇦 (@GrandpaRoy2) August 22, 2025
‘अमेरिकेला भारताची गरज’ ; डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ वादावर निक्की हेलीच्या व्यक्तव्याची जगभरात चर्चा