अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील माजी राजदूत निक्की हेली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील माजी राजदूत निक्की हेली यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफवरुन (Tarrif) भारतला महत्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी भारताला ट्रम्प यांची टॅरिफ भूमिका गांभीर्याने घेण्यास सांगितली आहे. त्यांच्या मते, रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा आणि टॅरिफवरील वाद यावर भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लवकरात लवकरच चर्चा करावी.
दोन्ही देशांनी मिळून यावर तोडगा काढावा आणि संबंधामध्ये दरार पडू देऊ नये. याचा फायदा चीन घेण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या अमेरिका आणि भारताचे व्यापार संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने सध्या भारतावर ५०% टॅरिफ लागू केला आहे, तसेच २५% दंडही लागू केला आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यावर ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादले आहे.
‘तर खरेदी करु नका…’ ; रशियन तेल खरेदीवरुन भारताचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना थेट सल्ला
निक्की हेली यांनी सशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ निर्णयाकडे लक्ष्य केंद्रित करावा. अमेरिका (America)आणि भारत हे जगातील दोन मोठे लोकशाही देश आहे. या देशांमध्ये अनेक दशकांपासून विश्वास आणि मैत्रीचे नाते आहे.
यामुळे मतभेद वाढू न देता संबंध टिकवून ठेवण्यावर भर द्यावा असे निक्की हेली यांनी म्हटले आहे. अमेरिक आणि भारताने धोरणात्मक उद्दिष्टांकडे लक्ष दिले पाहिजे, नाहीतर याचा फायदा शत्रू देश चीनला होईल. अमेरिकेला भारतासारख्या मित्राची गरज आहे, शत्रूची नाही.
India must take Trump’s point over Russian oil seriously, and work with the White House to find a solution. The sooner the better.
Decades of friendship and good will between the world’s two largest democracies provide a solid basis to move past the current turbulence.…
— Nikki Haley (@NikkiHaley) August 23, 2025
निक्की हेली यांनी रशियाकडून तेल खरेदी आणि व्यापाराशी संबंधित टॅरिफवरुन यापूर्वी तणाव दूर करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ही चूक करु नका असे म्हटले होते. यामुळे अमेरिका आणि भारताच्या संबंधामध्ये खोल दरी निर्माण होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला होता. त्यांनी याचा सर्वात जास्त फायदा चनला होईल असे म्हटले होते. यामुळे चीनला भारत आणि अमेरिकेमध्ये फूट पाडण्यास सोपे जाईल असेही त्यांनी म्हटले.
निक्की हेली यांच्या मते, भारताचा आर्थिक आणि भू-राजकीय विकास मजबूत होत आहे. यामुळे चीनच्या महत्वकांक्षी धोरणा कमकुत होतील. पण अमेरिका आणि भारत संबंधामध्ये कटुता आल्यास चीन याचा फायदा उचलेल. यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट संवाद साधण्याचा इशारा दिला आहे. या वादामुळे दोन्ही देशांना पुढे जाऊन अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.
डोनाल्ड ट्रम्पला झोंबणार मिर्ची? पुतिनसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर