Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solar Eclipse: शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण 6 मिनिटे आणि 23 सेकंद दिसणार; जाणून घ्या ते भारतात दिसेल का?

शास्त्रज्ञांच्या मते, २ ऑगस्ट २०२७ रोजी घडणारी ही घटना या शतकातील सर्वात नेत्रदीपक खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक असेल. या घटनेदरम्यान, दिवसा आकाश ६ मिनिटे आणि २३ सेकंदांसाठी पूर्णपणे अंधारमय होईल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 04, 2026 | 03:28 PM
longest total solar eclipse august 2 2027 duration 6 minutes visibility india egypt path

longest total solar eclipse august 2 2027 duration 6 minutes visibility india egypt path

Follow Us
Follow Us:
  • २१ व्या शतकातील सर्वात मोठे ग्रहण
  • दिवसा पडणार ६ मिनिटे २३ सेकंदांचा काळोख
  • भारतात दिसणार का?

Total Solar Eclipse August 2 2027 : अवकाशात घडणाऱ्या खगोलीय घटनांबद्दल मानवाला नेहमीच प्रचंड उत्सुकता राहिली आहे. लवकरच जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळप्रेमी २१ व्या शतकातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज होत आहेत. हे एक असे खग्रास सूर्यग्रहण असेल, ज्याला वैज्ञानिकांनी थेट ‘शतकातील सूर्यग्रहण’ (Solar Eclipse of the Century) असे संबोधले आहे. या अद्भुत घटनेदरम्यान, पृथ्वीच्या काही भागांत दिवसाच्या रणरणत्या उन्हात अचानक रात्रीसारखा गडद अंधार पसरेल. हा अद्भूत नजारा तब्बल ६ मिनिटे आणि २३ सेकंदांपर्यंत कायम राहणार असून, या काळात निसर्गाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळणार आहे.

अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ (NASA) च्या अहवालानुसार, हे ऐतिहासिक खग्रास सूर्यग्रहण २ ऑगस्ट २०२७ रोजी लागणार आहे. या ग्रहणाचे सर्वात मोठे आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याचा अपवादात्मकरीत्या असणारा प्रदीर्घ कालावधी. २१ व्या शतकात एवढ्या मोठ्या कालावधीचे सूर्यग्रहण अद्याप झालेले नाही आणि यापुढेही अनेक दशके होणार नाही. यापूर्वी पृथ्वीने १९९१ मध्ये एवढ्या प्रदीर्घ कालावधीचे खग्रास सूर्यग्रहण पाहिले होते. शास्त्रज्ञांच्या मते, आता २०२७ नंतर अशी अद्भूत आणि दुर्मिळ संधी थेट २११४ मध्ये, म्हणजेच पुढच्या शतकातच मानवाला मिळणार आहे. त्यामुळे या घटनेकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Salkhan Fossil : पृथ्वीच्या जन्माची गोष्ट सांगणारे ‘सोनभद्र’! 40 देशांतील शास्त्रज्ञांनाही समजली ताकद; बनणार जागतिक पर्यटन स्थळ

सूर्यग्रहण इतके दीर्घकाळ का टिकणार? काय आहे वैज्ञानिक कारण?

वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर जेव्हा चंद्र आपल्या कक्षेत फिरत असताना पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो आणि हे तिन्ही गोल एका सरळ रेषेत येतात, तेव्हा सूर्यग्रहण होते. चंद्राच्या या स्थितीमुळे त्याची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्य काही काळासाठी दिसेनासा होतो. परंतु, एखाद्या ग्रहणाचा कालावधी किती असेल, हे पूर्णपणे पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यातील अंतरावर अवलंबून असते. २ ऑगस्ट २०२७ रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या वेळी एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय योगायोग जुळून येत आहे, जो या ग्रहणाला एवढा मोठा बनवत आहे.

शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, २ ऑगस्ट रोजी चंद्र त्याच्या कक्षेत फिरताना पृथ्वीच्या अत्यंत जवळ असेल (Perigee स्थिती). तर दुसरीकडे, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर त्यांच्या कक्षेनुसार वर्षातील सर्वाधिक असेल (Aphelion स्थिती). या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमुळे, पृथ्वीवरून पाहताना सूर्य आकाराने नेहमीपेक्षा थोडा लहान दिसेल, तर चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे आकाराने बराच मोठा दिसेल. यामुळे चंद्राचे विशाल बिंब सूर्याला पूर्णपणे आणि जास्त वेळासाठी झाकून ठेवण्यास सक्षम असेल. खगोलीय वस्तूंचे असे एका रेषेत येणे आणि अंतराचा असा ताळमेळ बसणे ही एक अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते.

🌑 THE DAY THE SUN DISAPPEARS… On August 2, 2027, day will briefly turn into night as the longest total solar eclipse visible from land in the 21st century crosses parts of Europe, North Africa, and the Middle East. For up to 6 minutes and 23 seconds, the Moon will completely… pic.twitter.com/Q9zJw50oGY — Next Science (@NextScience) June 2, 2026

credit – social media and Twitter

सर्वात लांब सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

शतकातील सर्वात लांब आणि भव्य मानली जाणारी ही खगोलीय घटना पृथ्वीवर हजारो किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या ग्रहणाचा मार्ग (Path of Totality) अतिशय विस्तीर्ण आहे. याची सुरुवात स्पेनच्या वर अटलांटिक महासागराच्या क्षेत्रात होईल आणि सर्वप्रथम ते दक्षिण स्पेनमध्ये स्पष्टपणे दिसेल. त्यानंतर हे ग्रहण उत्तर आफ्रिकेतील देशांमधून पुढे सरकेल, ज्यामध्ये मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त, सुदान, सौदी अरेबिया आणि येमेनच्या काही भागांचा समावेश असेल.

परंतु, भारतातील खगोलप्रेमींसाठी एक अंशतः निराशाजनक बातमी आहे. हे ऐतिहासिक सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, कारण ग्रहणाचा मुख्य सावलीचा मार्ग भारतीय उपखंडातून जाणार नाही. असे असले तरी, भारतीय नागरिक आणि अंतराळप्रेमी विविध वैज्ञानिक संस्था, नासाच्या अधिकृत वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून या घटनेचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) घरबसल्या पाहू शकतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Trade: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’च्या चर्चेदरम्यान भारतासाठी मोठी लॉटरी; थेट अमेरिकेच्या राजदूतांनीच केली मोठी घोषणा

इजिप्त ठरणार जगाचे केंद्र केंद्रबिंदू; पर्यटनाला उधाण!

२ २०२७ चे हे भव्य सूर्यग्रहण पाहण्यासाठी आफ्रिकेतील ‘इजिप्त’ (Egypt) हा देश जगातील सर्वोत्तम आणि सर्वात महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. इजिप्तमधील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असलेल्या ‘राजांच्या दरी’ (Valley of the Kings) जवळील लक्सर (Luxor) शहराच्या प्राचीन अवशेषांमधून हे ग्रहण सर्वाधिक तीव्रतेने आणि स्पष्टपणे पाहायला मिळेल. लक्सरमध्ये दिवसा तब्बल ६ मिनिटे आणि १९ सेकंदांसाठी संपूर्ण अंधार राहील, जे या ग्रहणाच्या एकूण मुख्य कालावधीपेक्षा अवघे ४ सेकंद कमी आहे. या ऐतिहासिक क्षणाचे थेट साक्षीदार होण्यासाठी जगभरातील लाखो अंतराळप्रेमी, शास्त्रज्ञ आणि पर्यटकांनी आत्तापासूनच इजिप्त आणि लक्सर परिसरातील हॉटेल्स आणि प्रवासाचे नियोजन (Travel Planning) सुरू केले आहे, ज्यामुळे तेथील पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे.

Web Title: Longest total solar eclipse august 2 2027 duration 6 minutes visibility india egypt path

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Egypt
  • NASA
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
1

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
2

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
3

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

SCO Summit : बिश्केकमध्ये महासत्तांचे मंथन; युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष आज पंतप्रधान मोदींना भेटणार, खळबळ तीव्र
4

SCO Summit : बिश्केकमध्ये महासत्तांचे मंथन; युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष आज पंतप्रधान मोदींना भेटणार, खळबळ तीव्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.