Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Louisiana Shooting: अमेरिकेतील मॉल ऑफ लुइझियाना फूड कोर्टमध्ये वादाचे रूपांतर थेट गोळीबारात; एक जण ठार आणि पाच जण जखमी

Louisiana Shooting : गेल्या आठवड्यात, लुइझियानामध्ये एका दुःखद गोळीबारात एक ते १४ वर्षे वयोगटातील आठ मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, हा गोळीबार कौटुंबिक वादातून झाला होता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 24, 2026 | 09:44 AM
mall of louisiana shooting baton rouge shreveport 8 children killed updates 2026

mall of louisiana shooting baton rouge shreveport 8 children killed updates 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • मॉलमध्ये रक्ताचे पाट
  • दोन भीषण घटनांनी लुइझियाना हादरले
  • पाच संशयित ताब्यात

Mall of Louisiana shooting 2026 : जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अमेरिकेतील लुइझियाना राज्यात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ‘मॉल ऑफ लुइझियाना’ (Mall of Louisiana) मध्ये झालेला गोळीबार हा या राज्यातील गन कल्चरचा भीषण चेहरा समोर आणणारा ठरला आहे. फूड कोर्टमध्ये लोक दुपारचे जेवण करत असताना अचानक गोळ्यांचे आवाज घुमले आणि मॉलमध्ये एकच धावपळ उडाली. या घटनेने अवघ्या अमेरिकेला हादरवून सोडले आहे.

फूड कोर्टमध्ये थरार: कर्मचाऱ्यांनी ब्रेक रूममध्ये काढली रात्र

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १:२२ वाजता मॉलच्या फूड कोर्टमध्ये दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि पाहता पाहता दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार सुरू केला. कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्या डेझायर बॅटन यांनी सांगितले की, “तो अनुभव अत्यंत भयावह होता. गोळ्यांचा आवाज ऐकताच आम्ही स्वतःला एका विश्रांती कक्षात (Break Room) कोंडून घेतले. पोलीस येईपर्यंत आम्ही तिथे जीव मुठीत धरून लपून होतो.” या गोळीबारात १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गोळ्या लागल्याने जखमी झाले आहेत.

Tiroteo en centro comercial deja un muerto y cinco heridos Dos grupos de personas se dispararon entre sí en el área de restaurantes https://t.co/L7p20lv6b5 — Proceso (@proceso) April 24, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘मी खरंच मोठी चूक केली, ते मांजर-कुत्र्यांसारखे…’, इराणचं नाव घेऊन ट्रम्प यांनी पुन्हा केले खळबळजनक विधान

पोलिसांची मोठी कारवाई अन् महापौरांचा इशारा

बॅटन रूज पोलीस प्रमुख टीजे मोर्स यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पाच संशयितांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. महापौर सिड एडवर्ड्स यांनी गुन्हेगारांना सज्जड दम भरताना म्हटले की, “जर तुम्ही शहरात अशा प्रकारचे कृत्य केले, तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही.” सध्या मॉल परिसरात डझनभर पोलीस गाड्या, हेलिकॉप्टर्स आणि बुलेटप्रूफ जॅकेट घातलेले सशस्त्र अधिकारी गस्त घालत आहेत.

Fox 8 obtained video from inside the Mall of Louisiana in the aftermath of a mass shooting that left 1 dead and 5 injured. Authorities say suspects are still at large. pic.twitter.com/05lO9M4gQm — FOX 8 New Orleans (@FOX8NOLA) April 24, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Submarine Deal: राजनाथ सिहांची जर्मनी वारी यशस्वी! रडारवर अदृश्य, जर्मनीच्या मदतीने भारत बनवतोय जगातील सर्वात शांत पाणबुडी

श्रेव्हपोर्टमधील काळजाचा ठोका चुकवणारी घटना

मॉलमधील या घटनेच्या अवघ्या चार दिवस आधी, लुइझियानातील श्रेव्हपोर्ट (Shreveport) भागात मानवी क्रूरतेचा कळस पाहिला मिळाला. शमार एल्किन्स (३१) नावाच्या एका वडिलांनी कौटुंबिक वादातून स्वतःच्याच ७ मुलांची आणि एका भाच्याची (वय ३ ते ११ वर्षे) गोळ्या झाडून हत्या केली. या भीषण हत्याकांडात दोन महिलाही गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपीने पळून जाण्यासाठी कार चोरी केली होती, मात्र पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तो ठार झाला. एकाच आठवड्यात दोन मोठ्या गोळीबाराच्या घटनांमुळे लुइझियाना राज्यात आता बंदुकीच्या कायद्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मॉल ऑफ लुइझियानामध्ये गोळीबार का झाला?

    Ans: पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, फूड कोर्टमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर गोळीबारात झाले होते, हा कोणताही दहशतवादी हल्ला नव्हता.

  • Que: श्रेव्हपोर्टमधील गोळीबारात किती मुलांचा मृत्यू झाला?

    Ans: श्रेव्हपोर्टमधील कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबारात १ ते १४ वर्षे वयोगटातील एकूण ८ निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: मॉल गोळीबार प्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली आहे?

    Ans: बॅटन रूज पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी ५ संशयितांना ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Mall of louisiana shooting baton rouge shreveport 8 children killed updates 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • America
  • Shooting
  • World news

संबंधित बातम्या

World War 3: ‘मी खरंच मोठी चूक केली, ते मांजर-कुत्र्यांसारखे…’, इराणचं नाव घेऊन ट्रम्प यांनी पुन्हा केले खळबळजनक विधान
1

World War 3: ‘मी खरंच मोठी चूक केली, ते मांजर-कुत्र्यांसारखे…’, इराणचं नाव घेऊन ट्रम्प यांनी पुन्हा केले खळबळजनक विधान

Iran US War: ‘भारतीयांनी त्वरीत ईराण सोडावे…’, दुतावासाने जारी केली सूचना; ट्रम्पच्या धमकीने बिघडली मध्यपूर्वेतील स्थिती
2

Iran US War: ‘भारतीयांनी त्वरीत ईराण सोडावे…’, दुतावासाने जारी केली सूचना; ट्रम्पच्या धमकीने बिघडली मध्यपूर्वेतील स्थिती

Iran-US War: “लहान असो वा मोठी, कोणतीही बोट दिसल्यास थेट…”; डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुज सामुद्रधुनीबाबत खळबळजनक आदेश
3

Iran-US War: “लहान असो वा मोठी, कोणतीही बोट दिसल्यास थेट…”; डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुज सामुद्रधुनीबाबत खळबळजनक आदेश

Israel Iran Conflict : इराणचा आक्रमक पवित्रा! युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान इस्रायली गुप्तहेराला फाशी, मध्यपूर्वे पुन्हा पेटणार?
4

Israel Iran Conflict : इराणचा आक्रमक पवित्रा! युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान इस्रायली गुप्तहेराला फाशी, मध्यपूर्वे पुन्हा पेटणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.