
Chile Wildfire
डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय
चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी वाढता धोका लक्षात घेता बायोबायो आणि नुएवोमध्ये आपत्कालीन परिस्थितीची घोषणा केली आहे.तसेच त्यांनी आगीत मृत पावलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.
सध्या बचाव पथक आणि अग्निशमन दल आग विझवण्याचे कार्य करत आहे. परंतु उष्ण आणि जोरदार वाऱ्यामुळे आग प्रचंड वाढतच चालली आहे. यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडथळा येत आहे. बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. तसेच अनेक लोक घरांमध्ये अडकले आहेत. सध्या हजारो लोक रस्त्यावर आले आहेत. जंगलातील आग अंदाजे 8,500 हेक्टर क्षेत्रात पसरली आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आगीमुळे प्रभावित झालेल्या भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरु आहे. लोकांनी तात्पुरत्या निवास्थानांमध्ये स्थलांतरित केले जात आहे. अनेक गाड्या,शाळा आणि चर्च जळून खाक झाले आहेत. शेतात, घरात आणि रस्तांवर मृतहेद आढळले आहे.
चिलीमध्ये उन्हाळ्याचा हंगामात जंगलातील आग आता सामान्य बाब बनली आहे. दरवर्षी ही आग जानेवारीच्या सुरुवातीला सुरु होते ते फेब्रुवारीपर्यंत प्रचंड वाढते. यापूर्वी 2024 मध्ये या आगीत 130 जणांचा बळी गेला होता. या आगीमुळे शेजारील देश अर्जेंटिना देखील प्रभावित झाला होता.
Chile wildfire forces 20,000 to evacuate as flames 🅱️urn through Penco near Concepción President Boric declares State of Catastrophe as fire spreads across 23 kilometers Over 3,000 homes and a hospital now under direct threat Gas plant proximity raises explosion concerns pic.twitter.com/12XLmF3rwh — Boi Agent One (@boiagentone) January 18, 2026
Ans: चिलीच्या मध्य आणि दक्षिण भागातील प्रदेश बायोबायो आणि नुएवोमधील जंगलाला आग लागली आहे,
Ans: चिलीत जंगलात लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
Ans: चिलीतील आगीत 300 हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत.
Ans: प्रचंड उष्णता, कोरडे हवामान आणि जोरदार वाऱ्यांमुळे चिलीमध्ये आग लागली आहे.
Ans: चिली सरकारने लोकांच्या सुरक्षेसाठी बायोबायो आणि नुएवोमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. तसेच लोकांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या निवासस्थानांमध्ये स्थलांतरित केले जात आहे. आग विझवण्याचेही कार्य सुरु आहे.