डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता 'अल्लहा' चे नाव लिहिण्यास बंदी; 'या' देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय
सौदी अरेबियाच्या वाणिज्य मंत्रालयाने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केला आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, डिस्पोजेबल उत्पादने आणि शॉपिंग बॅग्सवर अल्लाहचे नाव लिहिण्यास आता परवानगी नाही. याचा हेतू धार्मिक पावित्र्याचे रक्षण करणे आहे. कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या वस्तूंवर अल्लाहच्या नावामुळे त्याचा अनादर होता. हा अनादर होऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुलरहमान अल-हुसेन अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. सोमवारपासून (१९ जानेवारी २०२६) हा नियम लागू होणार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, हा नवीन नियम प्रामुख्याने शॉपिंग बॅग, उत्पादन पॅकेजिंग आणि प्रमोशनल वस्तूंना लागू होणार आहे. तसेच अल्पकाळासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरही अल्लाहचे नाव लिहिण्यास बंद घालण्यात आली आहे.
वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुलरहमान अल-हुसेन यांनी म्हटले आहे की, अनेकवेधा लोक निष्काळजीपणे पॅकेजिंग फेकून देताना दिसत आहे. यामुळे अल्लाहचा अनावधानाने अनादर होत आहे. हा अनादर टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पंरपरांचा आदर राखला जाईल असे सरकारचे मत आहे.
सौदी सरकाने देशभरातील व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे. सर्व दुकाने आणि कंपन्यांना त्यांच्या इन्व्हेंटरीमधील पिशव्या आणि पॅकेजिंगची तपासणी करण्यास सांगितली आहे. कोणत्याही पिशवी, डिस्पोजेबल पॅकेजिंगवर अल्लाहचे नाव आढळल्यास त्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच नियमाचे पालन होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी कडक देखरेख केली जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
حرصًا على تعظيم أسماء الله الحسنى وصونها .. يُـمنع على المنشآت التجارية كتابة أسماء الله الحسنى أو لفظ الجلالة على كل ما يؤدي إلى تعرضها للامتهان ، مثل: (الأكياس والأغلفة) التي يؤول مصيرها إلى الاستخدام غير اللائق. pic.twitter.com/vfaYvUTMfa — وزارة التجارة | Ministry of Commerce (@MCgovSA) January 13, 2026
Ans: सौदी अरेबियाने धार्मिकतेचे रक्षण करण्यासाठी डिस्पोजिबल वस्तूंवर आता 'अल्लहा' चे नाव लिहिण्यास बंदी घातली आहे.
Ans: सौदी अरेबियाने धार्मिकतेचे रक्षण करण्यासाठी 'अल्लहा' चे नाव डिस्पोजिबल वस्तूंवर लिहिण्यास बंदी घातली आहे.
Ans: सौदी अरेबियाने शॉपिंग बॅग्स, उत्पादनांचे पॅकेजिंग, आणि आपात्कालीन वस्तूंवर अल्लाहचे नाव लिहिलण्यास बंदी घातली आहे.
Ans: नियम न पाळणाऱ्या व्यापारी संस्था आणि कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.






