
michigan road accident
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार बर्फवृष्टीमुळे हा अपघात झाला आहे. संपूर्ण रस्ते बर्फाखाली झाकले गेले आहे. तसेच खराब दृश्यमानतेमुळे वाहने चालवणे देखील कठीण झाले आहे. जोरदा थंड वारे वाहत असून रस्ता पूर्ण निसरडा झाला आहे. यामुळे वाहने अचानक घसरुन एकमेकांना धडकली आहे. चालकांना सावरण्याची संधीही मिळालेली नाही. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव पथेक घटनास्थळी पोहोचले आहेत. परंतु खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे. अनेक लोक गाड्यांमध्ये अडकले आहेत. सध्या या अपघातातील जखमींना बाहेर काढण्याचे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे कामा सुरु आहे.
स्थानिक प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. लोकांना कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनेक प्रमुख महामार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच हवामान अधिक खराब होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या अमेरिकेच्या अनेक मध्यपश्चिम भागांमध्ये तपामान अतिशय कमी झाले आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे विमान उड्डाणांवरही परिणाम होत आहे. परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
🇺🇸| Las autoridades de policía de #Michigan informaron que trabajan para despejar las vías luego del múltiple choque de unos 100 vehículos en una carretera cubierta de nieve al norte del Estado; reportan numerosos heridos pero ninguno mortal. 📹: @foxweather pic.twitter.com/OoYFMhoK3q — quiero tv (@quierotv_gdl) January 20, 2026
याच वेळी रशियाच्या कामचटाक प्रदेशातही जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे अनेक घरे बर्फाच्या चादरीखाली झाकले गेले आहेत. लोकांना खिडक्यांमधून उडी मारुन बाहेर पडावे लागत आहे. घरे, रस्ते, शाळा बर्फाखाली गाडले गेले आहेत. सध्या बर्फ हटवण्याचे कार्य सुरु आहे.
Ans: मिशिगनमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे रस्त्यांवर घसरणपण आणि खराब हवामानामुळे कमी दृश्यता निर्माण झाली आहे. यामुळे वाहने चालवताना चालंकाचे नियंत्रण सुटून भयावह रस्ते अपघात झाला आहे.
Ans: मिशिगनमध्ये १०० हून अधिक वाहने एकमेकांना धडकली आहेत.
Ans: प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.