पुतिनची मोदींना आश्वासक साद, पण चीन ठरतोय अडथळा! 'त्या' समुद्री मार्गावर ताबा मिळवण्यासाठी भारताला रशियाची मोठी ऑफर
Greenland Dispute : ‘ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही’ ; टॅरिफ धमकीवर डेन्मार्कचा ट्रम्पला स्पष्ट इशारा
आर्क्टिक प्रदेश हा पूर्णपणे बर्फाळ प्रदेश आहे. परंतु सध्या हवामान बदलामुळे येथील बर्फ वितळून नवा समुद्री मार्ग तयार होत आहे. हा समुद्री मार्ग व्यापाराच्या आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. याच समुद्री मार्गाजवळचे सर्वाच जवळचे बेट म्हणजे ग्रीनलँड असून हे येथून व्यापार करणे एखाद्या राष्ट्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते. यामुळेच अमेरिका, रशिया, चीनची या भागावर नजर खिळली आहे.
दरम्यान रशियाने या आर्क्टिक प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी रशियाने नवीन नॉर्थन रुट सी प्लॅन तयार केला आहे. हा समुद्री मार्ग रशियाच्या उत्तर किनारपट्टीला अटलांटिक आणि पुढे प्रशांत महासागराशी जोडतो. यामुळे या मार्गावरुन रशिया भारत आणि चीनशी व्यापारी भागीदारी वाढवू इच्छित आहे. या मार्गावरुन भारत आणि रशियातील व्यापार 100 अब्ज डॉलवरुन 200 अब्ज डॉलरपर्यंत पोहचू शकतो.
रशियाचा हा नवा मार्ग पारंपारिक स्वेझ कालव्याच्या तुलनेत भारतासाठी हा मार्ग 40 ते 50% प्रवास वाचवणारा आहे. यामुळे युरोप आणि आशियाई देशांमधील व्यापार हा अतिशय जलद आणि सुरक्षित होऊ शकतो. सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे या आर्क्टिक प्रदेशातील बर्फ 2035 पर्यंत पूर्ण वितळून हा मार्ग पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे. याचा भारताला व्यापाराच्या दृष्टीकोनातून मोठा फायदा आहे. यासाठी भारत आणि रशियामध्ये 2019 मध्ये सहकार्य करारही करण्यात आला आहे. याचा भाग म्हणून भारताला रशियाच्या आर्क्टिक नौदल बंदराचा वापर करण्याची परवानगीही मिळाली आहे.
परंतु भारत अद्यापही या प्रकल्पामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी झालेला नाही. यामागचे कारण म्हणजे रशियाच्या या नॉर्थन रुट सी प्लॅनमध्ये चीनचा सहभाग आहे. रशियाने माघार घेतल्यास येथे चीनचा प्रभाव अधिक असेल, शिवाय भारताने रशियाशी हातमिळवणी केल्यास अमेरिकेशी संबंध बिघडतील का? चीनच्या उपस्थितीमुळे भारताला कोणता धोका आहे का? असे प्रश्न उपस्थित होतात. रशियाशी भारताने हातमिळवणी केल्यास भारताला व्यापार, उर्जा आणि रणनीतीची मोठी संधी आहे. परंतु चीन यामध्ये अडथळा ठरत असून भारत सध्या विचारपूर्वक पावले उचलत आहे.






