Maulana asked Will you fight with India raise your hands The video went viral
Operation Sindoor : भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात अंतर्गत उठावाची स्पष्ट लक्षणं दिसू लागली आहेत. राजधानी इस्लामाबादमधील लाल मशिदीचे प्रमुख धर्मगुरू मौलाना अब्दुल अझीझ गाझी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानी सैन्याविरोधात उघडपणे बंडाचा सूर आळवला असून, सरकार व लष्करावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गाझी यांनी मशिदीत उपस्थित हजारो लोकांपुढे स्पष्टपणे विचारले की, “जर पाकिस्तानने भारताविरुद्ध लढा पुकारला, तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का? तुमच्यापैकी कोणी लढायला पुढे याल का?” मात्र, मौलानांच्या या प्रश्नानंतरही कोणत्याही व्यक्तीने हात वर केला नाही. संपूर्ण परिसरात मृतवत शांतता होती. त्यावर मौलाना गाझी म्हणाले, “माझ्या प्रश्नावर जर कोणी हात वर करत नसेल, तर याचा अर्थ स्पष्ट आहे. लोक स्वतःच्या देशावरही विश्वास ठेवत नाहीत.” हे वक्तव्य पाकिस्तानातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि लष्करी अस्थिरतेचे प्रतीक मानले जात आहे.
गाझी यांनी बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांतील पाकिस्तानी सैन्याच्या दडपशाही आणि अत्याचारांचे धक्कादायक तपशील उघड केले. त्यांनी आरोप केला की, “पाकिस्तान सरकार आणि सैन्य आपल्या देशातीलच नागरिकांवर बॉम्बस्फोट करत आहे. बलुच आणि पख्तून लोकसंख्येवर अन्यायाच्या घटना वाढल्या असून, अनेकजण बिनविलखीपणे बेपत्ता होत आहेत.” विशेषतः बलुचिस्तानमधील जनतेवर होणाऱ्या अन्यायाबाबत मौलानांनी सांगितले की, “सैन्य लोकांचे अपहरण करते, त्यांच्यावर खोटे आरोप लावून बंदी घालते, आणि त्यांच्याच गावांवर बॉम्बफेक करते.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : काय सत्य अन् काय तथ्य! ‘Operation Sindoor’नंतर पाकिस्ताननेही भारताचे पाच फायटर जेट पाडले…; पाक लष्करी प्रवक्त्यांचा दावा
मौलाना गाझींनी पाक लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि त्यांच्या कॉर्प्स कमांडर्सवर थेट टीका करत त्यांची खिल्ली उडवली. त्यांनी म्हटले की, “हे लोक केवळ सत्तेच्या आसक्तीत आहेत. ते देश व धर्माचे रक्षण करत नाहीत, उलट स्वतःच्या जनतेलाच शत्रू मानतात.” त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळालाही इशारा देत म्हटले की, “जनतेचा संयम संपत चालला आहे. देशाच्या अंतर्गत असंतोषाला लवकरच ज्वालामुखीचे स्वरूप येऊ शकते.”
दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले की, “भारत कधीही नियंत्रण रेषेवर सैनिकी कारवाई करू शकतो. आम्हीही त्याला सडेतोड उत्तर देऊ.” मात्र, पाकिस्तानमधील सामान्य जनतेमध्ये मात्र या धमक्यांचा अजिबात आधार उरलेला नाही, याचे दर्शन मौलाना गाझी यांच्या भाषणात आणि उपस्थित जनतेच्या प्रतिक्रिया शून्यतेत दिसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Operation Sindoor’ नंतर पाक पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची पहिलीच प्रतिक्रिया; जम्मू-कश्मीरमध्ये अलर्ट, विमानसेवा विस्कळीत
पाकिस्तानमध्ये सध्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय स्तरांवर तीव्र अस्वस्थता आहे. लष्कर व सरकारविरोधात इस्लामाबादसारख्या ठिकाणी खुलेआम सवाल उपस्थित होत आहेत. बलुचिस्तान व पख्तून प्रदेशातील सैनिकी कारवायांविरोधात आवाज उठवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मौलाना गाझी यांचा भाषण आणि त्यावर जनतेचा मौन प्रतिसाद यामुळे स्पष्ट होते की, पाकिस्तानमधील अंतर्गत असंतोष आता उघड रूप धारण करत आहे. भारताशी लढण्याचा इशारा देणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाला स्वतःच्याच जनतेचा पाठिंबा राहिलेला नाही, हीच आजची कटू वास्तविकता आहे.