Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Earth Science : दर महिन्याला 2 सेमीने जमिनीखाली खचतंय ‘हे’ शहर; NASA-ISROच्या ‘NISAR’ने वाजवली धोक्याची घंटा

Mexico City sinking NASA ISRO : मेक्सिको सिटीमधील जमीन वेगाने खचत आहे. नासा आणि इस्रोच्या निसार उपग्रहाने उघड केले आहे की, शहराचे काही भाग दर महिन्याला २ सेंटीमीटरपर्यंत खचत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 08, 2026 | 01:18 PM
mexico city sinking nasa isro nisar satellite report 2026

mexico city sinking nasa isro nisar satellite report 2026

Follow Us
Follow Us:
  • नासा-इस्रोचा खुलासा
  • भूजल उपसा हे मुख्य कारण
  • पायाभूत सुविधांना धोका

Mexico City sinking NASA ISRO : जागतिक स्तरावर हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर यामुळे अनेक शहरे संकटात आहेत, परंतु मेक्सिकोची राजधानी ‘मेक्सिको सिटी’ मधून आलेली बातमी सर्वांना हादरवून टाकणारी आहे. अंतराळ क्षेत्रातील दिग्गज संस्था नासा (NASA) आणि भारतीय अंतराळ संस्था (ISRO) यांच्या संयुक्त मोहिमेतील ‘निसार’ (NISAR) उपग्रहाने एक अत्यंत चिंताजनक माहिती उघड केली आहे. हे विशाल शहर हळूहळू पण सातत्याने जमिनीच्या पोटात गडप होत आहे. काही भागांमध्ये जमिनीखाली खचण्याचा वेग दर महिन्याला २ सेंटीमीटर इतका प्रचंड आहे, जो जगातील सर्वाधिक दरांपैकी एक मानला जातो.

ऐतिहासिक वारसा आणि झुकणाऱ्या इमारती

मेक्सिको सिटीच्या मध्यवर्ती भागात गेल्यावर हे संकट डोळ्यांनी स्पष्टपणे पाहता येते. शहराचे प्रसिद्ध कॅथेड्रल आणि त्या शेजारील चर्च चक्क विरुद्ध दिशेला झुकलेले दिसतात. इतकेच नाही तर मेक्सिकोचा ‘नॅशनल पॅलेस’ ही आता एका बाजूला कललेला आहे. या विदारक परिस्थितीचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे १९१० मध्ये बांधलेले ‘एंजल ऑफ इंडिपेंडन्स’ स्मारक. जेव्हा हे स्मारक बांधले गेले, तेव्हा ते जमिनीच्या समपातळीवर होते. मात्र, सभोवतालची जमीन इतकी खचली आहे की, आता त्या स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी खाली १४ नवीन पायऱ्या बांधाव्या लागल्या आहेत. गेल्या १०० वर्षांपासून शहर खचत असले तरी, आता या वेगाने शास्त्रज्ञांच्या कपाळावर आठ्या आणल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indian Navy: व्हिएतनाममध्ये भारताच्या फ्लोटिंग लॅबोरेटरी ‘INS Sagardhwani’चे जंगी स्वागत; सागरी विज्ञानाचे नवे रहस्य उलगडणार

शहर का खचत आहे? विज्ञानाचे उत्तर

या भौगोलिक बदलामागे एक साधे पण गंभीर कारण आहे. मेक्सिको सिटी हे शहर एका प्राचीन तलावाच्या (Ancient Lake) जागेवर वसलेले आहे. येथील जमिनीचा थर हा प्रामुख्याने मऊ चिकणमातीचा आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या पाण्याची ५०% गरज भागवण्यासाठी जमिनीखालून प्रचंड प्रमाणात भूजलाचा उपसा केला जातो. नासाचे शास्त्रज्ञ मारिन गोवरचिन यांच्या मते, आपण जमिनीतून ज्या वेगाने पाणी काढत आहोत, त्या वेगाने पावसाचे पाणी जमिनीखाली झिरपत नाहीये. यामुळे जमिनीतील पोकळी वाढते आणि वरचा जमिनीचा थर खाली दबला जातो.

दैनंदिन जीवनावर आणि पायाभूत सुविधांवर घाला

जमीन खचण्याचा परिणाम केवळ इमारतींवरच मर्यादित नाही. शहरातील रस्ते जागोजागी फाटत आहेत किंवा दबले जात आहेत. सर्वात मोठा फटका शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला बसला आहे. जमिनीच्या हालचालीमुळे जमिनीखालच्या पाइपलाइन फुटत असून, शहराच्या एकूण साठ्यापैकी तब्बल ४०% पाणी गळतीमुळे वाया जात आहे. याव्यतिरिक्त, शहरातील मेट्रो प्रणाली, जी लाखो लोकांसाठी प्रवासाचे साधन आहे, तिलाही या बदलांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यात मेट्रो मार्ग बंद करावे लागू शकतात किंवा मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Defense: Russia ‘आऊट’, India ‘इन’! भारतीय विनाशकारी शस्त्रास्त्रांचा आर्मेनियात धुमाकूळ; रशियाची मक्तेदारी संपली?

निसार उपग्रह: भविष्यातील संरक्षक

नासा आणि इस्रोचा निसार (NISAR) उपग्रह हा अशा प्रकारच्या जमिनीतील सूक्ष्म बदलांचा मागोवा घेण्यासाठीच तयार करण्यात आला आहे. हा उपग्रह प्रगत रडार तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीच्या पृष्ठभागावरील मिलिमीटर इतके लहान बदलही टिपू शकतो. या उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहितीमुळे मेक्सिकोच्या प्रशासनाला शहराचे कोणते भाग सर्वाधिक जोखमीचे आहेत, हे समजण्यास मदत होणार आहे. भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी आणि जल व्यवस्थापनात बदल करण्यासाठी ही आकडेवारी अत्यंत मोलाची ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेक्सिको सिटी दर महिन्याला किती सेमी खचत आहे?

    Ans: नासा-इस्रोच्या निसार उपग्रहानुसार, मेक्सिको सिटीचे काही भाग दर महिन्याला २ सेंटीमीटरपेक्षा जास्त वेगाने खचत आहेत.

  • Que: या शहराच्या खचण्यामागे मुख्य कारण काय आहे?

    Ans: सततचा वाढता भूजल उपसा आणि हे शहर एका जुन्या तलावाच्या मऊ चिकणमातीवर वसलेले असणे, ही यामागची मुख्य कारणे आहेत.

  • Que: 'निसार' (NISAR) उपग्रह नेमका काय आहे?

    Ans: निसार ही नासा आणि इस्रो यांची संयुक्त उपग्रह मोहीम आहे, जी पृथ्वीच्या जमिनीच्या हालचालींवर आणि बदलांवर बारकाईने लक्ष ठेवते.

Web Title: Mexico city sinking nasa isro nisar satellite report 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • ISRO
  • NASA
  • New Mexico
  • World news

संबंधित बातम्या

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा
1

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ
2

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ

Bangladesh: शेख हसीना पूर्ण तयारीने उतरणार मैदानात; दोन मोठ्या पक्षांचे विलीनीकरण अन् बदलणार बांगलादेशचे सत्तासमीकरण
3

Bangladesh: शेख हसीना पूर्ण तयारीने उतरणार मैदानात; दोन मोठ्या पक्षांचे विलीनीकरण अन् बदलणार बांगलादेशचे सत्तासमीकरण

Iran-US War : पश्चिम आशियातील महायुद्ध तीव्र; इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्ही मुलाखतीत उघड केला मोठा कट
4

Iran-US War : पश्चिम आशियातील महायुद्ध तीव्र; इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्ही मुलाखतीत उघड केला मोठा कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.