Microsoft Employees Protest Use of Azure Cloud Technology by Israel 18 Arrested
Miscrosoft News : अमेरिकेची प्रसिद्ध टेक कंपनी मायक्रोसॉप्ट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या कंपनीचे इस्रायसोबत खोल संबंध असल्याचा दावा केला जात आहे. शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आदोंलन कर्त्यांना अटक करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या मते, मायक्रोसॉप्ट इस्रायला युद्धात मदत करत आहे. कर्मचाऱ्यांच्या या दाव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ब्रिटिशी वृत्तपत्र द गार्डियनने दिलेल्या अहवामुळे हा वाद सुरु झाला आहे. द गार्डियने त्यांच्या अहवालात दावा केला आहे की, इस्रायली सैन्य गाझा आणि वेस्ट बॅंकतील पॅलेस्टिनीं नागरिकांवर नजर ठेवून आहे. यासाठी त्यांच्या मोबाईल फोनमधील डेटाचा वापर केला जात आहे.
हा डेटा मायक्रोसॉफ्टच्या अजूर क्लाऊड प्लॅटफॉर्मवर साठवला जातो. याचा वापर करण्याची परवानगी इस्रायलला मायक्रोसॉप्टने दिली आहे. हे सेवा नियामांच्या विरोधात आहे. यामुळे या विरोधात कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे.
याच वेळी मायक्रोसॉप्टने कोविग्टंन अँड बर्लिग लॉ फर्मकडे याच्या चौकशीची जबाबादारी सोपवली आहे. कंपनीने हे आरोप गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच यासाठी पूर्ण पारदर्शकतेने तपास करण्याचे आश्वासनही दिले आहे. पण कर्माचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळालेला नाही.
अजूर फॉर अपर्थाइट नावाच्या कर्मचारी गटाने कंपनीवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. कर्मचारी गटाने आरोप केला आहे की, मायक्रोसॉफ्टची सिस्टीम पॅलेस्टिनी लोकांना नजरबंद ठेवण्यासाठी, उपाशी मारण्यासाठी त्यांना ठार करण्यासाठी वापरली जात आहे.
फ्रेब्रुवारी २०२५ असोसिएटेड प्रेसने यांसंबंधी एक धक्कादायक खुलासा केला होता. AP ने मायक्रोसॉफ्टचे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंध असल्याचे म्हटले होते. ७ ऑक्टोबर २०२३ मधये हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने मायक्रोसॉफ्टच्या AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरु केली.
आतापर्यंत याच २०० पटीने वापर इस्रायलने केला आहे. दरम्यान यावर ‘नो अझूर फॉर अँपार्थाइड’ च्या आंदोलनकर्त्यांनी इस्रायली सैन्य गुप्त माहितीचे भाषांतर, विश्लेषण आणि प्रोसेसिंग करत असल्याचे म्हटले आहे. यावरुन इस्रायल पॅलेस्टिनी नागरिकांवर नजर ठेवत असल्याचा दावा या कामगार संघटनेने केला आहे.
यापूर्वी मायक्रोसॉप्टने, हा दावा फेटाळून लावला होता. त्यांना इस्रायलने गाझामध्ये त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आले नसल्याचे म्हटले होते. पण चौकशीचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर संशय अधिक वाढला.
सध्या मायक्रोसॉफ्टविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे. आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातील काहींना अटकही करण्यात आली आहे. एका कर्मचाऱ्याला कामावरुन काढूनही टाकण्यात आले आहे. परंतु आंदोलन अधिक तीव्र होत असून मायक्रोसॉप्टवर दबाव वाढत आहे.
मॉस्कोच्या शत्रूंची उडाली झोप! S-400 घेऊन समुद्रात उतरली जगातील सर्वात ताकदवर रशियन युद्धनौका