Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
युएईहून इस्रायलच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या ‘फ्लायदुबई’ (Flydubai Flight Incident) कंपनीच्या FZ1073 या विमानात हवेत ३० हजार फुटांवर एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटनेची नोंद झाली. विमानाचे सह-वैमानिक हमाम अल-हमामी याने अचानक विमानाचे मुख्य कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. कॉकपिटमध्ये असलेल्या आपत्कालीन कुऱ्हाडीचा वापर करून त्याने कॅप्टनवर गंभीर वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विमानात एकच घबराट पसरली आणि विमानाचा ताबा सुटण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
कॅप्टन स्मित मच्छर यांनी अत्यंत बिकट आणि वेदनादायी परिस्थितीतही कमालीचे शौर्य दाखवले. शरीरावर गंभीर जखमा झालेल्या असतानाही, त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून कॉकपिटचा सुरक्षा दरवाजा अनलॉक केला. दरवाजा उघडताच बाहेर असलेल्या प्रवाशांना आणि ऑफ-रोस्टर वैमानिकांना कॉकपिटमधील संघर्षाची जाणीव झाली. ताली मानेस यांना सर्वात आधी आवाज ऐकू आला आणि त्यांनी मदतीसाठी हाक मारली. यानंतर यानिव हायुन, असाफ राजौआन आणि झविका मानेस या प्रवाशांनी तातडीने कॉकपिटमध्ये धाव घेऊन हल्लेखोर सह-वैमानिकाला ताब्यात घेतले.
हल्लेखोराला ताब्यात घेतल्यानंतर विमानातील वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला. केबिन क्रूने प्रवाशांना त्यांच्या मूळ जागांवर परत जाण्याची आणि कॉकपिटचा परिसर रिकामा करण्याची सूचना दिली. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांच्या मनात क्रू सदस्यांबद्दल संशयाची पाल चुकचुकली. प्रवाशांना भीती वाटत होती की या संपूर्ण प्रकारात किंवा कटात केबिन क्रूचाही सहभाग असावा. त्यामुळे प्रवाशांनी क्रूची मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली आणि बांधलेल्या हल्लेखोराला सोडण्यास नकार दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर
जीविका मानेस आणि डॅनियल श्लिक्टर या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रू सदस्य त्यांच्यावर दबाव आणत होते. मात्र, प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देत हल्लेखोराला इअरफोनच्या तारांनी घट्ट बांधून ठेवले. “आम्हाला स्वतःचे संरक्षण करायचे आहे आणि पोलीस येईपर्यंत आम्ही याला सोडणार नाही,” अशी ठाम भूमिका प्रवाशांनी घेतली. प्रवाशांच्या या सतर्कतेमुळे विमानाचा ताबा पुन्हा मिळवणे शक्य झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
हल्लेखोर हमाम अल-हमामी याला बांधून ठेवल्यानंतर प्रवाशांनी त्याला ऑक्सिजन मास्क लावला, जेणेकरून तो जिवंत राहील आणि तपासादरम्यान या कटामागील सत्य समोर येऊ शकेल. विमानात प्रवास करत असलेले दंतचिकित्सक डॉ. शोता मुसेव यांनी गंभीर जखमी झालेल्या कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर तातडीने प्राथमिक वैद्यकीय उपचार केले. कॅप्टनच्या शरीरावर खोल जखमा होत्या, परंतु त्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे विमानातील सर्व १७५ प्रवाशांचे प्राण वाचले.
कॉकपिटवर पुन्हा नियंत्रण मिळवल्यानंतर ऑफ-रोस्टर वैमानिकांनी विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर विमानाचे सौदी अरेबियातील एका विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. तेथे स्थानिक पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ विमानात प्रवेश करून हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि जखमी कॅप्टनला रुग्णालयात दाखल केले. प्रवाशांनी दाखवलेल्या अभूतपूर्व धैर्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक मोठा विमान अपघात आणि कट यशस्वीरीत्या उधळून लावला गेला.






