Middle East Conflict Iran strikes on American military base in Syria
Iran Strike On America’s Military Base in Syria : तेहरान : अखेर इराणने अमेरिकेच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला आहे. इराणी माध्यमांनी या हल्ल्याचे वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या इराणच्या लष्करी तळांवरील हल्ल्याच्या ३६ तासांनंतर हा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सीरियातील अमेरिकेच्या तळावरील हल्ला हा इराणकडून पहिला हल्ला मानला जात आहे. मात्र अद्याप इराणने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. परंतु इराणच्या परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी हल्ल्याचे संकेत आधीच दिले होते. त्यांनी सांगितले होते की, मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांना उद्ध्वस्त करण्यात येईल.
मीडिया रिपोर्टनुसार, सीरियाच्या पश्चिम हसका प्रांतातील अमेरिकन तळावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इराणने हा हल्ला मोर्टारने केला असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप या हल्ल्यात कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.
संयुक्त राष्ट्राती इराणचे दूक अमीर सईद यांनी इरावनी यांनी इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे संकेत दिले होते. इरावनी यांनी म्हटले होते की, आम्ही याला प्रमाणबद्ध प्रत्युत्तर देऊ. अमेरिकेने आमचे काहीही काही नुकसान केले आहे, तेवढेच आम्हीही करु.” सध्या इस्रायलमुळे ट्रम्प यांनी त्यांच्या लोकांचा जीव धोक्यात घातला असल्याचेही इराणने म्हटले होते.
इराणने याची कारणेही ही दिली होती. अमेरिकेने बी-२ बॉम्बर्सने इराणच्या नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो या अणु केंद्रावर हल्ला केला होता. ट्रम्प यांनी ही अणु केंद्र नष्ट केल्याचा दावा केला. इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणे याचा उद्देश असल्याचे म्हटले. तर इराणने हा हल्ला बेकायदेशीर असल्याचे म्हटले. तसेच इराणच्या सावभौमत्वाविरोधात खेळ असल्याचेही इराणने म्हटले. इराणच्या मते अमेरिकेने कायद्याचे उल्लंघन केले आहे.
सध्या इराणे सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. तसेच हा तळ इराणपापूसन ११०० किलोमीटर अंतरावर आहे. बशर अल-असदच्या काळात इराणचे सीरियात प्रभुत्व होते. परंतु गेल्या वर्षी सत्तापालट झाले आणि सीरियात अल-जुलानीचे नवीन सरकार स्थापन झाले आहे.