Middle East Conflict: सध्या मध्य पूर्वेत विनाशाचे चित्र उमटले आहे. अमेरिकेच्या इराणच्या अणुतळांवरील हल्ल्यानंतर संघर्ष अधिक पेटला आहे. इराणध्ये संतापाचे वातावरण आहे. १३ जून रोजी इस्रायल आणि इराणध्ये संघर्ष सुरु झाला होता. याच वेळी जागतिक स्तरावर परराष्ट्र देशांकडून दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले जात होते. या युद्धा अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इस्रायलवरील हल्ले थांबवण्याची धमकीही दिली होती. अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी म्हटले.
मात्र इराणने इस्रायललावरील हल्ले सुरुच ठेवले. याच वेळी २२ जून रोजी अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुतळांवर नतान्झ, फोर्डो, आणि इस्फाहन या ठिकाणांवर हल्ला केला. यामुळे मध्य पूर्वेत सुरु असलेला संघर्ष अधिक बिघडली. इराणने देखील या हलल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. परंतु याच वेळी आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. इराणवर हल्ला होणार असल्याची माहिती एका मुस्लिम राष्ट्राला आधीत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचा सर्वात शक्तिशाली बी-२ बॉम्ब इराणवर पडणार असल्याची माहिती अखाती देश तुर्कीला आधीच मिळालेली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांना फोन करुन हल्ल्याची माहिती दिली होती.ट्रम्प यांनी हल्ल्यापूर्वी एर्दोगानशी दोन वेळा फोनवर चर्चा केली अशी माहिती व्हाईट हाऊसच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, एर्दोगान यांनी इराण आणि अमेरिकेने तुर्कीमध्ये अणुकारारावर चर्चा करावी अशी इच्छा व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी याला सहमती दर्शवली होती. त्यांनी म्हटले की, इराण सहमत असेल तर अमेरिका देखील इस्तंबूलमध्ये बैठक घेईल. यासाठी बैठकीसाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स आणि मध्य पूर्व राजदूत विटकॉफ यांनी अमेरिकेतून पाठवतील असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
ट्रम्प यांनी म्हटले की, अंतिम करारासाठी इराणला संदेश पाठवला आहे असेही त्यांनी म्हटले होते. परंतु इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी संताप व्यक्त केला होता. इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी तुर्कीचा हा प्रस्ताव नाकारला होता. खामेनीं यांनी अमेरिकेच्या अटींवर चर्चा करण्यास नकार दिला. यानंतर ट्रम्प यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी सैन्याला इराणवर हल्ला करण्याचे आदेश दिले.
अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने तीव्र संताप व्यक्त केला होता. तसेच प्रतिहल्ल्यासाठी तयार राहण्यासही अमेरिकेला सांगतिले होते. यामुळे सध्या सगळ्यांच्या नजरा इराणकडे आहे. तसेच यामुळे ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत ५० हजार अमेरिकन सैन्य तैनात केले आहे. तसेच इराणने हल्ला केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे.