US Iran War : इराणच्या घरात घुसून मारणार अमेरिका? मध्यपूर्वेत तब्बल ३,५००० सैनिक दाखल, काहीतरी मोठे घडणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन सेंट्रल कमांडने जपानमधील तैनात सैनिक आखाती देशांमध्ये रवाना केले आहे. तब्बल ३,५०० सैनिक युद्धनौकेसह खाडी देशात पोहोचले आहेत. इराणकडून सातत्याने होणारे ड्रोन आणि मिसाइल हल्ले पाहात अमेरिका इराणमध्ये जमिनीमार्गे कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, USS Tripoli (LHA-7) हे महाकाय असॉल्ट शिप २७ मार्च रोजी मध्यपूर्वेत दाखल झाले आहे. या जहाजावर ३१ व्या मरीन एक्सपेडिशनरी युनिटचे ३,५०० सैनिक आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या तुकडीचे सैनिक तैवानच्या समुद्रात लष्करी सरावर करत होते. परंतु मध्यपूर्वेतील वाढता धोका पाहता या सैन्याच्या तुकडीला वळवण्यात आले आहे. या जहाजांवर केवळ सैनिकच नाही, तर स्ट्राइक फायटर एअरक्राफ्ट आणि अत्याधुनिक युद्ध शस्त्रे आहेत.
या तैनाती नंतर ‘ग्राउंड वॉर सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर उत्तर देताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले की, अमेरिका आपली उद्दिष्टे जमिनीमार्गे साध्य करु शकेत. परंतु राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असावेत यासाठी ही तयारी केली जात असल्याचे रुबियो यांनी म्हटले.
अमेरिकेच्या या हालचालींमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. इराणने आक्रमक भूमिका काय ठेवली तर अमेरिका प्रत्यक्षात युद्धात उतरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
युद्धाच्या घडामोडींदरम्यान अमेरिकेत आणखी एक गोंधळ उडाला आहे. ट्रम्प सरकारविरोधात शेकडो अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. लोक नो किंग्सचे नारे देत आहे. मध्यपूर्वेतील युद्ध, देशांतील वाढते इंधन दर आणि आर्थिक अडचणी इमिग्रेशन यांसारख्या मुद्द्यावर ट्रम्प सरकारच्या धोरणांविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन सेंट्रल कमांडने जपानमधील तैनात सैनिक आखाती देशांमध्ये तैनात केले आहे. परंतु अद्याप कोणत्या लष्करी कारवाई अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Ans: मध्यपूर्वेत अमेरिकेने तब्बल ३,५०० सैनिकांची तुकडी तैनात केली आहे.






