'इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तान नव्हे, तर भारत हाच खरा मध्यस्थ आहे', 'रिच डेड पुअर डेड'च्या लेखकाने सांगितला 'पडद्यामागील खेळ' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Robert Kiyosaki on India Iran War mediator : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर(US-Israel Iran War) केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण पश्चिम आशिया पेटला आहे. या युद्धाच्या भीषण वणव्यात आता एका अशा व्यक्तीने एन्ट्री घेतली आहे, जिच्या पुस्तकांनी जगाला आर्थिक धडे दिले. ‘रिच डॅड, पुअर डॅड’ (Rich Dad Poor Dad) या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी इराण-अमेरिका युद्धावर एक अशी फेसबुक पोस्ट लिहिली आहे, ज्याने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. कियोसाकी यांच्या मते, जगाच्या डोळ्यासमोर पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याचे दिसत असले, तरी पडद्यामागे सूत्रे भारत हलवत आहे.
रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे मांडले आहे की, “पाकिस्तान मध्यस्थ असल्याच्या बातम्या केवळ देखावा आहेत. खरी राजनैतिक चर्चा पडद्यामागे सुरू आहे, ज्याबद्दल जगाला सध्या काहीच माहिती नाही.” त्यांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांशी बोलण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी प्रदीर्घ चर्चा केली होती. या चर्चेतच युद्धाच्या समाप्तीची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. पाकिस्तानचा वापर केवळ एका बाजूचा निरोप दुसऱ्या बाजूला पोहोचवण्यासाठी केला जात आहे, पण मुख्य वाटाघाटी ‘दिल्ली’तून होत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Nepal Ties: ‘तो तर फक्त ट्रेलर होता’ बालेन शाह ‘ॲक्शन मोडमध्ये येताच PM मोदींना पाठवला संदेश; वाचा नेमके काय म्हटले?
कियोसाकी यांनी भारताची तुलना पाकिस्तान, तुर्की किंवा इजिप्तसारख्या देशांशी केली आहे. ते म्हणतात, “भारताची परिस्थिती इतर कोणासारखी नाही. भारत ही एकमेव शक्ती आहे जिची एकाच वेळी अमेरिका, इराण आणि इस्रायल या तिन्ही बाजूंकडे विश्वासार्हता आहे.” इराणचे भारतासोबत ऊर्जेचे घनिष्ठ संबंध आहेत, चाबहार बंदरात मोठी गुंतवणूक आहे. दुसरीकडे, अमेरिकेची भारतासोबत मजबूत सामरिक भागीदारी आहे. भारताचा शब्द इराण टाळू शकत नाही आणि अमेरिकाही भारताच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
‘भारताची परिस्थिती पाकिस्तान, तुर्की किंवा इजिप्तपेक्षा वेगळी आहे. सर्व बाजूंनी मजबूत उपस्थिती असलेला भारत हा एकमेव देश आहे. दुसरीकडे, अमेरिकेचा तर सोडाच, इस्रायलचाही पाकिस्तानवर विश्वास नाही. पश्चिम आशियातील सध्याच्या संघर्षात पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावू शकत नाही.’
रॉबर्ट कियोसाकी
या युद्धाचा सर्वाधिक फटका भारताला बसत आहे, हे कियोसाकी यांनी अधोरेखित केले. होर्मुझची सामुद्रधुनी विस्कळीत झाल्यामुळे भारताचा तेल पुरवठा धोक्यात आला आहे. तसेच, आखाती देशांमध्ये राहणारे ९० लाख भारतीय देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावतात. २०२६ मध्ये भारत ब्रिक्स (BRICS) चे अध्यक्षपद भूषवणार आहे, जिथे रशिया आणि चीनसारख्या महासत्ता भारतासोबत आहेत. या सर्व कारणांमुळे भारताला हे युद्ध थांबवण्यात सर्वाधिक रस आहे आणि त्या दृष्टीने भारताची पावले पडत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bangladesh ties: ‘शेवटचा शब्द, आम्ही भारताच्या विरोधात…’ बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी ‘असे’ म्हणून नवी दिल्लीत जिंकली मने
कियोसाकी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या भूमिकेचेही कौतुक केले. ज्या दिवशी ट्रम्प आणि मोदींचे बोलणे झाले, त्याच दिवशी जयशंकर इराणच्या राजदूतांशी दिल्लीत चर्चा करत होते. ही केवळ योगायोग नाही, तर एका मोठ्या रणनीतीचा भाग आहे. इस्रायल आणि अमेरिकेचा पाकिस्तानवर अजिबात विश्वास नाही, पण भारताच्या शब्दाला जगात मान आहे, हेच कियोसाकी यांनी जगाला पटवून दिले आहे.
Ans: कियोसाकी यांच्या मते, इराण-अमेरिका युद्धात भारत हाच खरा मध्यस्थ आहे, तर पाकिस्तान केवळ एक निरोप पोहचवणारा दूत आहे.
Ans: कारण ट्रम्प यांना माहित आहे की मध्य-पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी भारताचा प्रभाव आणि विश्वासार्हता इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे.
Ans: होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारताचा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे आणि आखाती देशांतील ९० लाख भारतीयांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती आहे.






