इराणमध्ये अजूनही ट्रम्पचा खेळ सुरुच? पॅसिफिकवरून अमेरिकी विमानांचे उड्डाण, नेमकं काय शिजतंय?
Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?
परंतु आता काही वेगळीच माहिती समोर आली आहे. ट्रम्प दुहेरी डाव खेळत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामागचे कारण म्हणजे अमेरिकी सैन्याच्या मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी हालचाली. नुकतेच अमेरिकेच्या विमानांनी पॅसिफिक महासागरातून मध्यपूर्वेकडे उड्डाण घेतली आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून इराणवर हल्ला निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.
सोशल मीडियावरील एका पोस्टनुसार, अमेरिकेच्या अब्राहम लिंकन कॅरियन स्ट्राइक ग्रुप मध्यपूर्वेकडे रवाना झाला आहे. या ग्रुपनमध्ये अत्याधुनिक लढाऊ विमाने, मिसाईल्स, युद्धनौका, यांचा समावेश आहे. या शस्त्रांची तैनाती केवळ शक्तिप्रदर्शन नसून इराणवर संभाव्य लष्करी कारवाई म्हणून पाहिले जात आहे. परंतु सध्या व्हाइट हाऊसने कोणत्याही प्रकारच्या थेट कावाईचे संकेत फेटाळून लावले आहेत.
८०० लोकांची फाशी रद्द
इराणमध्ये गेल्या महिन्यात खामेनी सरकारविरोधात आंदोलन सुरु झाले होते. या आंदोलनात २००० हून अधिक लोकांचा बळी गेला होता. तसेच ५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणवर कठोर कारवाईचे संकेत दिले होते.
पण याच वेळी मध्यपूर्वेतील आखातील देश सौदी अरेबिया आणि कतारने अमेरिकेला हल्ला झाल्यास तीव्र युद्ध भडकण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला होता. यानंतर इराणने देखील देशातील परिस्थिती लक्षात घेऊन आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे फाशी रद्द केल्या. यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचे आभारा मानले होते. सध्या अमेरिकेच्या या दुहेरी धोरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मध्यपूर्वेत नेमकं काय सुरु आहे? अमेरिका इराणवर हल्ला करणार आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
As tensions rise between U.S. and Iran, the Pentagon is moving a carrier strike group toward Middle East. The USS Abraham Lincoln, west of the Philippines, turned west yesterday, detected on @CopernicusEU satellite imagery by @oballinger’s computer program. 11.9892, 117.9423. pic.twitter.com/Zz8rokebZq — Christiaan Triebert (@trbrtc) January 15, 2026






