Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘ट्रम्प यांना सोडणार नाही’ ; खामेनेईंच्या हत्येनंतर पेटून उठला इराण; अमेरिकेला दिली थरकाप उडवणारी धमकी

US Iran War Update : मध्यपूर्वेतील इराण-अमेरिका तणाव प्रचंड वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये हल्ले सुरुच असून शाब्दिक वारही सुरु आहे. नुकतेच इराणच्या एका अधिकाऱ्याने खामेनेंच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी अमेरिकेला दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 04:46 PM
Middle East War Iran Threatens Trump after Khamenei Killing

Middle East War Iran Threatens Trump after Khamenei Killing

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या सर्वोच्च अधिकाऱ्याची अमेरिकेला थरकाप उडवणारी धमकी
  • खामेनेईंच्या हत्येचा बदला घेऊनच राहणार
  • मध्यपूर्वेतील तणावात वाढ
US Iran War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण तणावात प्रचंड वाढ झाली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायले संयुक्तपणे इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केले होते. या मोहिमेअंतर्गत केलेल्या हल्ल्याच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला होता. यानंतर मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. खामेनेईंच्या हत्येनंतर इराण पेटून उठला. इराणने आतापर्यंत मध्यपूर्वेतील अमेरिकन-इस्रायल तळांना आणि दूतावासांना लक्ष्य केले आहे. तसेच पुन्हा एकदा खामेनेईंच्या हत्येचा बदला घेण्याची धमकीही दिली आहे.

US Iran War : ‘इराण कधीच झुकणार नाही’ ; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिकेला स्पष्टच सांगितले

इराणची बदल्याची भाषा

खामेनेईंच्या हत्येनंतर इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी अमेरिके राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना उघड धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही ट्रम्प यांना सोडणार नाही, त्यांना आपल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.’ लारीजानी यांनी म्हटले की, आमच्या नेत्याला आणि हजारो निष्पाप नागरिकांना मारल्याचा बदला घेतल्याशिवाय इराण शांत बसणार नाही. त्यांनी हा लढा दीर्घकाळ आणि शेवटपर्यंत सुरु राहिल असाही इशारा दिला.

राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचाही गंभीर इशारा

याच वेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनीही अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणच्या स्वाभिमानाचा एक इंच तुकडाही कोणाला घेऊ दिला जाणार नाही. ते केवळ आमचे आत्मसमर्पणाचे स्वप्नच पाहू शकतात.

त्यांनी स्पष्ट केले आहे की, इराण कोणत्याही देशावर हल्ला करण्यास उत्सुक नाही. परंतु कोणी इराणच्या सार्वभौमत्वला आणि प्रादेशिक अखंडतेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात. येईल. आमच्या भूमीला वाचवण्यासाठी आम्हा शांत बसणाक नाही. कोणत्याही थराला जाणून राष्ट्राचे रक्षण करु, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

दुसरीकडे मात्र ट्रम्प यांनी इराणच्या धमक्यांना धूडकावून लावले आहे. इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे उद्धवस्त केल्याशिवाय थांबणार नाही. आता शांततेने चर्चा करण्याची वेळ निघून गेली असून केवळ आत्मसमर्पणाचा पर्याय इराणसमोर राहिलेला आहे असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तसेच इराण शरणागती पत्करत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच राहतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Oil Imports : ‘परवानगीची गरज नाही’ ; रशियन तेल खरेदीवरून भारतानं अमेरिकेला दिलं स्पष्ट उत्तर

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणच्या कोणत्या अधिकाऱ्याने अमेरिकेला धमकी दिली आहे?

    Ans: इराणच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे सचिव अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांना धमकी दिली आहे.

  • Que: इराणच्या अधिकारी अली लारीजानी यांनी ट्रम्प यांना काय धमकी दिली आहे?

    Ans: त्यांनी म्हटले की इराण आपल्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूचा बदला घेईल.

  • Que: इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात संयुक्त लष्करी कारवाई केली होती. या वेळी केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला.

  • Que: या प्रकरणावर ट्रम्प यांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: ट्रम्प यांनी इराणच्या धमक्यांना धूडकावू लावले असून याचा त्यांना काही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. तसेच इराणने कोणत्याही अटीशिवाय शरणागती पत्करावी अन्यथा हल्ले सुरूच राहतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Web Title: Middle east war iran threatens donald trump after khamenei killing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Middle East War: युद्ध चिघळले! अमेरिकेसोबत सौदी सैन्याचा इराकमध्ये मोठा बॉम्बहल्ला; इराण-समर्थित मिलिशियांचे अनेक तळ उद्ध्वस्त
1

Middle East War: युद्ध चिघळले! अमेरिकेसोबत सौदी सैन्याचा इराकमध्ये मोठा बॉम्बहल्ला; इराण-समर्थित मिलिशियांचे अनेक तळ उद्ध्वस्त

War Alert: इस्रायल अन् युक्रेन एकत्र लढणार? युद्धाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमधील ‘त्या’ भेटीने पुतिन आणि इराणची झोप उडवली
2

War Alert: इस्रायल अन् युक्रेन एकत्र लढणार? युद्धाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमधील ‘त्या’ भेटीने पुतिन आणि इराणची झोप उडवली

Russia-Ukraine War: युक्रेनची रशियाविरोधात मोठी तयारी सुरू; झेलेन्स्की यांच्या अमेरिका भेटीचा ‘Patriot’ मिसाइल ठरला केंद्रबिंदू
3

Russia-Ukraine War: युक्रेनची रशियाविरोधात मोठी तयारी सुरू; झेलेन्स्की यांच्या अमेरिका भेटीचा ‘Patriot’ मिसाइल ठरला केंद्रबिंदू

Europe Wildfire: युरोपच्या इतिहासातील सर्वात भयंकर वणवयाचा थरार;15 जणांचा मृत्यू, 3 लाख लोकांचे पलायन
4

Europe Wildfire: युरोपच्या इतिहासातील सर्वात भयंकर वणवयाचा थरार;15 जणांचा मृत्यू, 3 लाख लोकांचे पलायन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.