US Iran War : 'इराण कधीच झुकणार नाही' ; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिकेला स्पष्टच सांगितले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Oil Imports : ‘परवानगीची गरज नाही’ ; रशियन तेल खरेदीवरून भारतानं अमेरिकेला दिलं स्पष्ट उत्तर
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणच्या स्वाभिमानाचा एक इंच तुकडाही कोणाला घेऊ दिला जाणार नाही. ते केवळ आमचे आत्मसमर्पणाचे स्वप्नच पाहू शकतात, अशी तीव्र शब्दात पेझेश्कियान यांनी टीका केली आहे. रविवारी (०८ मार्च) एका वृत्तंसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत पेझेश्कियान यांनी हे विधान केले आहे.
त्यांनी स्पष्ट केले आहे की, इराण कोणत्याही देशावर हल्ला करण्यास उत्सुक नाही. परंतु कोणी इराणच्या सार्वभौमत्वला आणि प्रादेशिक अखंडतेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात. येईल. आमच्या भूमीला वाचवण्यासाठी आम्हा शांत बसणाक नाही. कोणत्याही थराला जाणून राष्ट्राचे रक्षण करु, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
या वेळी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यपूर्वेतील शेजारी आखाती देशांनाही सावध केले आहे. कोणत्याही देशाने अमेरिका-इस्रायल हवाई हल्ल्यांसाठी आपली जमीन किंवा हवाई हद्द वापरण्यास दिली तर इराण त्या देशावरही जवाबी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे त्यांनी म्हटले. यापूर्वी देखील इराणने अमेरिकेच्या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवरील हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील आखाती देशांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये अमेरिकन लष्करी तळे आणि दूतावासांना लक्ष्य करण्यात आले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला अनेक वेळा आत्मसमर्पणाचा इशारा दिला आहे. त्यांनी एअरफोर्सवनमध्ये पत्रकारांशी बोलताना, म्हटले होते की, इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे उद्धवस्त केल्याशिवाय थांबणार नाही. आतात शांततेने चर्चा करण्याची वेळ निघून गेली असून केवळ आत्मसमर्पणाचा पर्याय इराणसमोर राहिलेला आहे असे ट्रम्प यांनी खेट म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला आहे.
Middle East War : UAE मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! दूतावासाकडून कडक नियमावली जाहीर
Ans: इराणच्या स्वाभिमानाचा एक इंच तुकडाही कोणाला घेऊ दिला जाणार नाही. ते केवळ आमचे आत्मसमर्पणाचे स्वप्नच पाहू शकतात, अशी तीव्र शब्दात पेझेश्कियान यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे.
Ans: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले आहे की, इराणच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा एक इंचही कोणाला देणार नाही. इराणवर हल्ला झाला किंवा इतर देशांनी अमेरिका- इस्रायलला त्यांच्या भूमीचा, हवाई दला वापर करू दिला, तर इराण प्रत्युत्तर देण्यास मागे हटणार नाही.






