Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : अमेरिकेचा इराणच्या छाताडावर वार! एका रात्रीत मुख्य लष्करी तळ उडवल्याचा ट्रम्प यांचा दावा

US Attack On Iran : अमेरिका-इराण संघर्षाला दोन आठवडे उलटून गेले आहेत. तरीही युद्ध थांबण्याचे नाव घेईना. अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर जोरदार प्रहार केला आहे. अमेरिकन सैन्याने इराणचे मुख्य लष्करी तळ नष्ट केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 14, 2026 | 09:18 AM
US Strike on Iran's Military base on kharg island

US Strike on Iran's Military base on kharg island

Follow Us
Follow Us:
  • तिसऱ्या आठवड्यातही अमेरिका-इराण संघर्ष सुरु
  • इराणच्या महत्त्वपूर्ण लष्करी तळावर हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा दावा
  • इराण काय करणार आता?
US Attack on Iran : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील तणावाला आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. मात्र अमेरिका-इराण संघर्ष (US Iran War) काही थांबण्याचे नाव घेईना. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी इराणची कमकुवत नस दाबल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणच्या धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या खर्ग बेटावरील लष्करी तळ उद्ध्वस्त केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली असून आखाती क्षेत्रात युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहे. जागतिक तेल पुरवठ्यावरही मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

Strait of Hormuz: भारतासाठी मोठी बातमी! होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना ‘ग्रीन सिग्नल’; युद्धातही इराणने जपली मैत्री

इराणच्या छाताडावर वार

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन या हल्ल्याची माहिती दिली. त्यांनी या मोहिमेचे वर्णन मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली आणि विनाशकारी लष्कर मोहिम असे केले आहे. त्यांच्या मते, इराणची लष्करी ताकद अमेरिकेने मोडित काढली आहे. इराणच्या नौदल शक्तीला सुरुंग लावण्याचा त्यांचा हेतू होता असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

खर्ग बेटा का आहे महत्त्वाचे

खर्ग बेट पर्शियन गल्फमध्ये इराणच्या किनाऱ्यापासून ३३ किमी अंतरावर स्थित आहे. हे बेट इराण (Iran) च्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. कारण या बेटावरुनच इराणच्या ९०% कच्चा तेलाचा उत्पादन जागतिक बाजारपेठेत निर्यात केले जाते. दररोज सुमारे ७० लाख बॅरल तेल येथून जहाजांमध्ये भरले जाते. तज्ज्ञांच्या मते, या केंद्रावर हल्ला इराणची आर्थिक कणा मोडण्यासाठी पुरेशी आहे.

सध्या अमेरिकेने या बेटावरील केवळ लष्करी तळांना उद्ध्वस्त केले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेचा हेतू तेल टर्मिनल आणि पाइपलाइन ताब्यात घेण्याचा असून सध्या त्यांनी संयम बाळगला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांनी इराणने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे तेल साठेही सुरक्षित राहणार नाहीत हेही स्पष्ट केले आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी

हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा इराणने आक्रमक होऊन होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे. यामुळे अनेक तेलाचे जहाज समुद्रात अडकून पडले आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने इराणच्या अर्थव्यवस्थेवर वार केला आहे. ज्यामुळे इराण होर्मुझची पकड अधिक मजबूत करण्याची शक्यता आहे. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक तेल बाजारात मोठा उर्जा संकट उभे राहून इंधनाचे दर गगनाला भिडतील.


Strait of Hormuz Tension : आखातात 23000 भारतीय खलाशी, होमुर्जच्या सामुद्रधुनीत 24 जहाजे, केंद्राने परिस्थितीचा दिला आढावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणच्या कोणत्या लष्करी तळावर हल्ला केला आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेने खर्ग बेटावर असलेल्या इराणच्या मुख्य लष्करी तळांवर हल्ला केला आहे.

  • Que: खर्ग बेट महत्वाचे का आहे?

    Ans: खर्ग बेट हे इराणसाठी धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे मानले जाते. या बेटावरुन इराणच्या एकूण कच्चे तेल निर्यातीपैकी ९०% निर्यात या बेटावरुन होते. दररोज लाखो बॅरल्स तेल जागतिक बाजारात पाठवले जातात.

  • Que: खर्गवरील तेल साठ्याबाबात काय माहिती आहे?

    Ans: सध्या अमेरिकेने खर्ग बेटावरील इराणच्या तेल साठ्यांना कोणतेही नुकसान पोहोचवलेले नाही, परंतु इराणने पलटवार केल्यास तेलसाठेही नष्ट होण्याची शक्यता आहे.

  • Que: ट्रम्प यांनी हल्ल्याबाबत काय म्हटले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी खर्गवरील हल्ल्याची माहिती ट्रुथवरुन दिली. त्यांनी सांगितले की, इराणची कुमकुवत नस आम्ही दाबली आहे. इराणने याला प्रत्युत्तर दिले तर त्यांचे तेल साठेही सुरक्षित राहणार नाहीत असा इशारा दिला आहे.

Web Title: Middle east war us strike on irans military base on kharg island

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?
1

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

Mossad : ‘पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला संपवणार होती इस्रायली मोसाद…’ ब्राझीलच्या पत्रकाराचा स्फोटक खुलासा
2

Mossad : ‘पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला संपवणार होती इस्रायली मोसाद…’ ब्राझीलच्या पत्रकाराचा स्फोटक खुलासा

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…
3

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

Venezuela Earthquake : अखेर मृतांचा आकडा समोर! आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू, तर शेकडोहून अधिक जखमी
4

Venezuela Earthquake : अखेर मृतांचा आकडा समोर! आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू, तर शेकडोहून अधिक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.