Mineral oil reserves in Pakistan Donald Trump fell victim to rumors
Pakistan News Marathi : इस्लामाबाद : अलीकडे पाकिस्तानमध्ये (Pakistan)तेल आणि वायूचे मोठे साठे सापडल्याचे दावे केले जात आहेत. शिवाय खजिना सापडल्याचा दावाही बऱ्याचदा करण्यात आला आहे. मात्र याबाबत कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाही. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देखील पाकिस्तानमध्ये प्रचंड तेल साठा सापडल्याचा दावा केला होता. तसेच अमेरिका याला विकसित करण्यासाठी मदत करणार असल्याचे म्हटले. मात्र त्यांच्या या दाव्यावर कोणतेही अधिकृत पुरावे समार ओलेले नाहीत.
ट्रम्प यांच्या दाव्याची पाकिस्तानमध्ये देखील खिल्ली उडवली जात आहे. लोकांनी याला कॉमेडी शो म्हटले आहे. पण अलीकडे अशा बातम्या वारंवार का येत आहे. नेमकं काय खरं आहे.
US Deportation : अमेरिकेने भारतीयांना दाखवला बाहेरचा रस्ता; आकडेवारी जाणून बसेल धक्का
तर याची सुरुवात झाली २०१९ मध्ये. इम्रान खान (Imran Khan) त्यावेळेचे पंतप्रधान होते. त्यांनी पाकिस्तानचत्या कराचीमध्ये समुद्रकिनाऱी २३०-२८० किमी अंतरावर तेल आणि गॅसचा प्रचंड मोठा सापडल्याची घोषणा केली होती. इराणच्या सीमेजवळ हा खजिना असल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे पाकिस्तानच्या तेलाच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल, तसेच तेल व्यापारही वाढेल असे इम्रान खान यांनी म्हटले होते. मात्र याचे ठोस पुरावे सादर करण्यात आले नाही.
त्या काळातही अमेरिकन कंपनी एक्सॉनमोबिल आणि इटालियन कंपनी एएनआय समुद्रात केक्रा-१ ब्लॉकमध्ये खोदकाम सुरु केले होते. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या दाव्यामुळे पाकिस्तानमध्ये तेल आणि वायूचे साठे सापडल्याच्या अफवा तेव्हापासून उडू लागल्या. यासाठी १२४ अब्ज डॉलर्स खर्च देखील पाकिस्तानने केला. मात्र पाकिस्तानला काहीही सापडले नाही.
२०२४ मध्ये देखील पाकिस्तानने ‘ब्लू ट्रेझर’ सापडल्याचा दावा केला होता.पाकिस्तानने समुद्री क्षेत्रात तेल आणि वायूचा साठा सापडल्याचा दावा केला होता. याला जगातील सर्वात मोठा चौथा साठा असल्याचे म्हटले जात होते मात्र या दाव्यावरही ठोस पुरावे मिळाले नसल्याने प्रश्नचिन्ह आहेत.
ही बाब पाकिस्तानसाठी लाजिरवाणी होती. इम्रान खान यांचे सर्व दावे खोटे ठरत होते. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाकिस्तानमध्ये तेलाच्या साठ्याचा दावा आणि येत्या काळात भारत पाकिस्तानकडून तेल खरेदी करणार असल्याचे विधान जागतिक स्तरावर खळबळ उडवून देत आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
पाकिस्तान तेल आणि खनिजे सापडल्याचा दावा का करत आहे?
पाकिस्तान देशात परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि देशातील संकट लवण्याच्या हेतूने असे दावे करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होईल परिणाम?
या दाव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे, कराण या दाव्यांचे आतापर्यंत कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत.