US Deportation : अमेरिकेने भारतीयांना दाखवला बाहेरचा रस्ता; आकडेवारी जाणून बसेल धक्का (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडे ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांनी जगाला मोठा धक्का दिला आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) टॅरिफ लादण्याच्या आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी मित्र देश भारताला देखील मोठा धक्का दिला आहे. भारतावर २५% टॅरिफ लागू केले आहे, तर बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना देखील बाहेर काढत आहे.
आतापर्यंत ट्रम्प यांनी १७०० हून अधिक भारतीयांची देशातून हाकलपट्टी केली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतीयांना हद्दपार करण्याची संख्या अलीकडच्या काळात वाढत चालली आहे. ट्रम्प यांनी २० जानेवरी २०२५ रोजी शपथ घेतली. तेव्हापासून आतापर्यंत १७०३ भारतीयांना मायदेशी पाठवण्यात आले आहे. यामध्ये ६२० लोक पंजाबचे, ६०४ हरियाणाचे तर गुजरातचे २४५ आणि जम्मू-काश्मीरच्या १० लोकांना हद्दपार करण्याक आले आहे.
Muhammad Yunus : ‘अमेरिकेसोबत व्यापारात अपयशी…’ ; बांगलादेशचा भारताला टोला
पररराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या सात महिन्यांत ट्रम्प प्रशासनाने १७०७ भारतीयांना हद्दपार केले आहे. रोज जवळपास ८ भारतीयांना हद्दपार केले जात आहे. ही संख्या बायडेन प्रशानाच्या काळातील आकडेवारीपेक्षा तिप्पट वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण ७२४४ भारतीयांना देशातून परत पाठवण्यात आले आहे.
दरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने व्हिसा धारकांना इमिग्रेशन कायद्यांचे पालन करण्याता इशारा दिला आहे. सध्या इमिग्रेशन कायद्याअंतर्गत तपासणी देखील केली जात आहे. लोकांचे व्हिसा रद्द करुन त्यांना हद्दापर केले जात आहे. तसेच अमेरिकेने व्हिसा नियम देखील कडक करण्यास सुरुवात केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनने फेब्रुवारी महिन्यात लष्करी विमानांनी ३३३ भारतीयांना परत पाठवले होते. मार्च, जून महिन्यांतही त्यांनी चार्टर विमानांनी २३१ जणांना, तर जुलैमध्ये ३०० भारतीयांना हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १७०३ हद्दपार करण्यात आले आहे.
यातील ८६४ जणांना चार्टर आणि लष्करी विमानांनी मायदेशी पाठवण्यात आले आहे. पनामामधून ७२ भारतीयांना परत पाठवले आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. आतापर्यंत १४१ महिलांना देशात परत पाठवण्यात आले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांचे बेकायदेशीर स्थलांतर (Illegal immigration)धोरण?
डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातून बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याचे धोरण सुरु केले आहे. याअंतर्गत बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत एन्ट्री केलेल्या लोकांवर कारवाई करुन त्यांना त्यांच्या मायदेशात परत पाठवले जात आहे.
का सुरु करण्यात आले आहे धोरण?
मानवी तस्करी रोखण्याच्या उद्देशाने आणि देशातील परदेशी लोकांची संख्या कमी करण्याच्या हेतूने ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेतील भारतीयांवर काय परिणाम?
अमेरिकेत सर्वात अधिक संख्या भारतीयांची आहे. यामुळे देशातून हजारोंमध्ये बेकायदेशीर भारतीयांना बाहेर पाठवले जात आहे. आतापर्यंत १७०० हून अधिक लोकांना परत पाठवण्यात आले आहे.
तिसरे महायुद्ध भडकणार? अमेरिकेच्या अणु पाणबुड्या रशियाच्या निशाण्यावर; आता काय करणार ट्रम्प?