Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi G7 Summit : ‘दहशतवादी हल्ला…’ G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला फटकारले

PM Narendra Modi G7 Summit: कॅनडातील कनानिस्किस येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या नेत्यांना भेटले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला फटकारले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 18, 2025 | 08:53 AM
Modi attacks Pakistan from G-7 summit takes firm stand on terrorism

Modi attacks Pakistan from G-7 summit takes firm stand on terrorism

Follow Us
Close
Follow Us:

PM Narendra Modi G7 Summit: कॅनडाच्या कानानस्किसमध्ये पार पडलेल्या G-7 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांसमोर पाकिस्तानवर थेट टीका करत स्पष्ट शब्दांत दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडली. “दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे आणि जो देश दहशतवादाला पाठिंबा देतो, त्याला त्याची किंमत मोजावीच लागेल,” असे ठाम शब्दांत मोदींनी म्हटले.

G-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी १७ जूनला कॅनडाच्या कानानस्किस येथे दाखल झाले. या परिषदेदरम्यान त्यांनी दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केल्या. पण या सर्व भेटींच्या पलीकडे, मोदींचे भाषण विशेष गाजले ते त्यांच्या पाकिस्तानविरोधी स्पष्ट भूमिकेमुळे.

दहशतवादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

G-7 आउटरीच सत्रात बोलताना पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. “हा हल्ला केवळ पहलगामवरील नव्हता, तर तो प्रत्येक भारतीयाच्या आत्म्यावरील, ओळखीवरील आणि प्रतिष्ठेवरील आक्रमण होता. ही मानवतेवरची थेट चिथावणी होती,” असे मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “दहशतवाद हे लोकशाही, शांतता, आणि मानवतेच्या मूल्यांना आव्हान देणारे आहे. आपल्याला याबाबत कोणताही गोंधळ न ठेवता स्पष्ट धोरण आणि भूमिका घ्यावी लागेल. जो कोणी देश दहशतवादाला उघडपणे किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतो, त्याला याची किंमत चुकवावी लागेल. दुटप्पी धोरणांनी जगात स्थैर्य येणार नाही.”

हे देखील वाचा : International Picnic Day 2025: या दिवसाची सुरुवात कशी झाली? पिकनिकसाठी ‘ही’ ठिकाणे आहेत परिपूर्ण

ग्लोबल साउथसाठी भारताची वकिली

मोदींनी केवळ दहशतवादावरच नव्हे, तर ‘ग्लोबल साउथ’मधील देशांच्या अडचणींवरही भाष्य केले. ते म्हणाले, “ग्लोबल साउथमधील देश अनेक संकटांशी सामना करत आहेत. अन्न, इंधन, खत व आर्थिक संसाधनांच्या टंचाईचा सर्वाधिक फटका याच देशांना बसतो. जागतिक स्थैर्याच्या चर्चेत त्यांचा आवाजही समोर आणणे, ही भारताची जबाबदारी आहे.” या वक्तव्याने भारताने स्वतःला केवळ एक प्रादेशिक नेता म्हणून नव्हे, तर ‘ग्लोबल साउथ’चा प्रवक्ताही म्हणून मांडले.

कॅनडाच्या पंतप्रधानांनी मोदींचे केले स्वागत

G-7 परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांनी औपचारिक स्वागत केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंबंधी ‘X’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले, “जागतिक सहकार्य आणि प्रगतीसाठी पूल बांधण्याची संधी. पंतप्रधान मोदी यांचे कॅनडामध्ये स्वागत.”

Fully agree with you, PM Giorgia Meloni. India’s friendship with Italy will continue to get stronger, greatly benefitting our people!@GiorgiaMeloni https://t.co/LaYIIZn8Ry — Narendra Modi (@narendramodi) June 17, 2025

credit : social media

भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढती भूमिका

मोदींचे G-7 शिखर परिषदेमधील हे भाषण केवळ पाकिस्तानविरोधी चेतावणी नव्हते, तर भारताची वाढती जागतिक भूमिका, स्पष्ट परराष्ट्र धोरण, आणि ग्लोबल साउथसाठीची बांधिलकी यांचे प्रतिबिंब होते. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, जपान, इटली आणि कॅनडा या सात शक्तिशाली देशांच्या G-7 समूहात भारत हा सदस्य नसला तरी, आउटरीच सत्रांद्वारे भारताची उपस्थिती सातत्याने वाढत आहे.

हे देखील वाचा : Viscacha : किती गोड! दक्षिण अमेरिकेतील आळशी दिसणारा, पण साहसी आणि कणखर असा ‘हा’ गोंडस छोटा प्राणी

पंतप्रधान मोदींनी G-7 परिषदेतून दिलेला संदेश

पंतप्रधान मोदींनी G-7 परिषदेतून दिलेला संदेश केवळ पाकिस्तानसारख्या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर रोष व्यक्त करणारा नव्हता, तर संपूर्ण जगाला उद्देशून होता. दहशतवाद, दुटप्पी धोरणं आणि अनिश्चिततेच्या काळात भारताचा ठाम, पारदर्शक आणि मानवतावादी दृष्टिकोन स्पष्टपणे मांडणारा हा संदेश जागतिक व्यासपीठावर भारताची प्रतिष्ठा अधिक उंचावणारा ठरला.

Web Title: Modi attacks pakistan from g 7 summit takes firm stand on terrorism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • G-7
  • G-7 summit
  • PM Narendra Modi
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तानला मोठा झटका! तालिबानी विदेशी मंत्री येणार भारतात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी
1

पाकिस्तानला मोठा झटका! तालिबानी विदेशी मंत्री येणार भारतात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती
2

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral
3

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
4

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.